…अन्यथा अकलूज आगार प्रमुखांना साडी-चोळी व बांगड्या भेट देणार, श्री. बलभीम जाधव तालुकाध्यक्ष भाजपा किसान युवा मोर्चा

महिलांमध्ये अकलूज आगाराबद्दल संतापाची भावना
अकलूज (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील अकलूज आगारात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. महिलांच्या प्रसाधन गृहाची तर अतिशय बिकट अवस्था आहे. त्यामुळे महिलांमधून अकलूज आगाराबद्दल तीव्र संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भाजपा किसान युवा मोर्चाचे माळशिरस तालुकाध्यक्ष बलभीम जाधव यांनी अकलूज आगार प्रमुखांना साडी-चोळी व बांगड्या भेट देणार असल्याचे सांगितले आहे.
अकलूज आगारातील सुलभ शौचालयास चक्क दरवाजेच नाहीत तसेच कोणत्याही प्रकारची स्वच्छता नाही. आणि वॉशरूमचे पैसे राजरोसपणे अडवणूक करून घेतले जात आहेत. असा अत्यंत चिड आणणारा प्रकार अकलूज आगारामध्ये होत आहे. त्यांनी स्वतः आत्तापर्यंत सहा ते सात लेखी तक्रारी पुराव्यासहित दिल्या आहेत. यावर पाचशे रुपये दंड करण्याशिवाय कोणत्याही प्रकारची कार्यवाही सदर स्वच्छतागृह चालकावरती आजपर्यंत झालेली नाही.

तसेच महिलांच्या प्रति अकलूज आगाराची ही अक्षम्य असंवेदनशीलता आहे. महिलांच्या स्वच्छतागृहात दरवाजे नसणे ही अकलूज आगार प्रशासनास लाज वाटणारी गोष्ट आहे, अशी खंतही यावेळी त्यांनी व्यक्त केली.
तसेच स्वच्छतागृहात उभे राहू वाटत नाही एवढी दुर्गंधी आहे. महिलांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार अकलूज आगारातील स्वच्छतागृहात राजरोसपणे चालू आहे.

येत्या १० दिवसात सदर स्वच्छतागृहाचे दरवाजे बसवणे, फलक लावणे, महिला कर्मचारी उपलब्ध करणे, सर्वत्र स्वच्छता ठेवणे व बेकायदेशीर पैशासाठी होणारी अडवणूक थांबली नाही तर अकलूज आगार डेपो मॅनेजर यांना साडी-चोळी व बांगड्या समस्त महिला वर्गाकडून भेट देण्यात येतील, असा इशारा भाजपा किसान युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बलभीम जाधव यांनी दिला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



