गाव चलो अभियानाच्या माध्यमातून भाजप प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचणार – चेतनसिंह केदार सावंत

सांगोला (बारामती झटका)
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तम संघटनात्मक बांधणी करत, विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून भाजप कार्य करत आहे. तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे मागच्या १० वर्षातील प्रभावी कार्य, मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती पोहोचण्याच्या उद्देशाने गाव चलो अभियान हाती घेण्यात आले आहे. गाव चलो अभियानाच्या माध्यमातून भाजप प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचणार आहे. १० वर्षातील मोदी सरकारच्या योजना व उल्लेखनीय कामगिरीची माहिती देणारी पत्रके वितरित करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील, खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात व्यापक जनसंपर्कासाठी गाव चलो अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली. यावेळी बोलताना चेतनसिंह केदार सावंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला दहा वर्षांची कामगिरी पूर्ण झाली आहे.

सरकारने विविध क्षेत्रात दमदार कामगिरी केली. 2014 पासून 25 कोटी भारतीय दारिद्ररेषेच्या बाहेर आले आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 80 कोटी लोकांपेक्षा अधिक भारतीयांना मोफत रेशन दिले जात आहे. प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत केली जात आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हीच मोदींची गॅरंटी असल्याने आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चार कोटी लोकांना घरे दिली आहेत. महाराष्ट्रात महिलांना एसटी प्रवास दरात 50 टक्के सूट दिली आहे. राज्यात पायाभूत सुविधांचा विकास झाला असून सोलापूर येथे पी.एम. आवास योजनेअंतर्गत प्रकल्पातील सर्वाधिक १५ हजार घरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करून 1143 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे.
राज्यात जलयुक्त शिवार योजनेमुळे भूजल पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा उपलब्ध करून दिला आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत 95 टक्के अनुदान दिले जात आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी 11 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्यातील शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 300 कोटी तर शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी 350 कोटी रुपये उपलब्ध करून दिले असून राज्यस्तरावर दुर्ग प्राधिकरण स्थापन केले जाणार आहे. राज्यातील भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ यासह प्राचीन मंदिराच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत 4 कोटी शेतकऱ्यांना 4.7 लाख कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. तर 77 हजार 595 कोटी रुपयांचे 99 सिंचन प्रकल्प सुरू झाले असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.