स्वराज साखर कारखान्याने सातारा व सोलापूर जिल्ह्यात उच्चांकी दर दिला…

लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखाना उपळवे, ता. फलटण, जि. सातारा
फलटण (बारामती झटका)
स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेड संचलित लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखाना उपळवे, ता. फलटण, जि. सातारा या साखर कारखान्याने सातारा व सोलापूर जिल्ह्यात उच्चांकी ऊस दर दिलेला आहे. गाळपासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रति टन 3101 रुपयांचा रक्कम वर्ग केलेले आहेत. त्यामूळे शेतकरी वर्गामधून समाधानाचे वातावरण व्यक्त केले जात आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज साखर कारखाना यशस्वीपणे सुरू आहे. सोलापूर व सातारा जिल्ह्यामध्ये कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेल्या रकमेमध्ये उच्चांकी दर दिलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.