ताज्या बातम्याराजकारण

“घासून नाय तर ठासून” मोहिते पाटील यांना पाडून नाकावर टिच्चून येणार, “कहो दिल से रणजीत निंबाळकर फिरसे”

शरदचंद्र पवार, विजयसिंह मोहिते पाटील यांच्यापेक्षा पाणीदार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची पाण्याची दमदार कामगिरी, “लोकसभेच्या निवडणुकीत पाणी पेटणार”

माळशिरस (बारामती झटका)

माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे देशाचे नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार व राज्याचे नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील या बड्या नेत्यांनी प्रतिनिधित्व करूनसुद्धा माढा लोकसभा मतदार संघातील पाण्याचे व इतर प्रश्न सुटलेले नव्हते. माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांची पाण्याची दमदार कामगिरी झालेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पाणी पेटणार आहे. श्रेय वादापेक्षा पाण्याच्या प्रश्नावर निवडणूक होऊन माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर व पाणीदार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुनश्च माढा लोकसभेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मतदार सज्ज झालेला असल्याने ठासून नाही तर मोहिते पाटील यांना पाडून नाकावर टिच्चून येणार, “कहो दिल से रणजीतसिंह नाईक निंबाळकर फिरसे”, अशी माढा लोकसभा मतदारसंघात चर्चा सुरू आहे.

शरदचंद्रजी पवार व विजयसिंह मोहिते पाटील यांनी माढा लोकसभेचे प्रतिनिधित्व करीत असताना केंद्रात व राज्यात एकाच विचाराचे सरकार असताना मतदारसंघात कोणतेही मोठे काम अथवा योजना राबविलेली नव्हती. मतदारांसाठी कोणतीही ठोस योजना अंमलात आणलेली नव्हती. उलट सोलापूर जिल्ह्यामध्ये येणारे पाणी बारामतीला सहमतीने वळविले होते‌‌. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढा लोकसभेतील मतदारांनी निवडून दिल्यानंतर पहिले काम निरा देवधर योजनेतील माळशिरस व इतर तालुक्यातील हक्काचे पाणी सोलापूर जिल्ह्यात वळविण्याचे धाडसी काम पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेले होते.

माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण, सांगोला, करमाळा, माढा, पंढरपूर या तालुक्यातील रेंगाळलेल्या सिंचन प्रकल्पाला गती देऊन मार्गी लावले आहे.

माळशिरस तालुक्यात पश्चिम भागातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची असणारी निरा देवधर प्रकल्पातील कॅनलचा प्रश्न सोडवून तालुक्यातील सोळा गावांचा समावेश असताना वंचित असणारी सोळा गावे समाविष्ट करण्याचे काम केलेले आहे. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील 32 गावांचा पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटलेला आहे. मतदार संघातील सिंचनाच्या प्रश्नाबरोबर रस्ते, एमआयडीसी, रेल्वे अशी अनेक विकास कामे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सहकार्याने सोडविलेले आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शरदचंद्रजी पवार ज्यांच्या खांद्यावर व विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्याने लढवीत असणारे धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवीत आहेत, ज्यांच्या हातात असताना मतदार संघासाठी काहीही केले नाही त्यांचे राजकीय वारसदार धैर्यशील मोहिते पाटील काय करणार, असाही सवाल सर्वसामान्य जनता व मतदार यांच्यामधून येत आहे‌. माढा लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या सिंचनाचे व इतर कामे बंद करण्याचा मोहिते पाटील यांचा हेतू आहे का, असाही संशय मतदारांमध्ये वाढत आहे. माढा लोकसभेची निवडणूक श्रेय वादापेक्षा पाण्याच्या प्रश्नावर होणार आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनता व मतदार म्हणत आहे घासून नाही तर ठासून मोहिते पाटील यांना काढून नाकावर टिच्चून येणार, कहो दिल से रणजीतसिंह नाईक निंबाळकर फिरसे, असे माढा लोकसभा मतदारसंघात मतदारांमधून बोलले जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button