गिरझणी येथील मुलांनी साकारली जंजीरा किल्ल्याची प्रतिकृती.
गेल्या अनेक वर्षांपासून किल्ल्यांची प्रतिकृती बनविण्याचा छंद जोपासला आहेत.
अकलूज (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यात गिरझणी येथील लहान मुला-मुलींनी छत्रपतींच्या किल्ल्यांची प्रतिकृती साकारून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जतन करण्याचे काम करीत आहेत. दरवर्षी शाळेला दिवाळी सुट्टी मिळाली की वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारत आहेत.
गिरझणी येथील कु. साक्षी लावंड, कु. पल्लवी लावंड, महेश लावंड व गणेश लावंड हे चौघे दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना जरी गड किल्ले पाहण्यासाठी जरी जाता येत नसले तरी या मुलांनी तयार केलेले किल्ले बघून समाधानी होतात. यापुर्वी ही त्यांनी शिवनेरी किल्ला, रायगड किल्ला, सिंहगड किल्ला, कोल्हापूर येथील पन्हाळा किल्ल्यांच्या प्रतिकृती यापुर्वी बनविल्या आहेत.
विशेष म्हणजे ही मुले किल्ल्यांची छायाचित्र बघून हुबेहूब किल्ल्याच्या प्रतिकृती बनवित असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना छत्रपतींच्या किल्ल्याची माहिती मिळते व शिवाजी महाराजांच्या कार्याच्या इतिहासाचे ज्ञान मिळत आहे. हा किल्ला पाहण्यासाठी दररोज लोकांची गर्दी होत आहे. पत्रकार कृष्णा लावंड यांची मुले आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Alemdağ su kaçak tespiti Küçükyalı su kaçağı tespiti: Küçükyalı’da su kaçağı tespitinde hızlı sonuç. https://suomennbaseura.com/ustaelektrikci