ताज्या बातम्यासामाजिक

पुणे-पंढरपूर रोडवर वेळापूर नजीक पिसेवाडी गावच्या हद्दीत उभ्या असलेल्या गाडीला पाठीमागून धडक देऊन भीषण अपघात…

श्रावण मासानिमित्त मुंबईहून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी निघालेल्या गाड्यांचा खुडूस-वेळापूर दरम्यान अपघात..

वेळापूर (बारामती झटका)

श्रावण मासानिमित्त मुंबईहून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या दोन गाड्यांचा खुडूस-वेळापूर दरम्यान पिसेवाडी गावच्या हद्दीत शुक्रवार दि. 25/07/2025 रोजी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास अपघात झालेला आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग पुणे-पंढरपूर रोडवर एम एच 48 डीडी 4996 गाडी लहान बालकाला भूक लागल्याने रस्त्याच्या कडेला उभी केलेली होती. सदर गाडीचे पार्किंग लाईट सुरू होती. पाठीमागून त्याच दिशेने एम एच 01 बीयु 0962 या गाडीने पाठीमागून येऊन जोरात धडक दिल्याने भीषण अपघात झालेला आहे. धडक देणारी लहान गाडी असून सुद्धा धडक दिलेली ईरटीका गाडी मोठी असताना सुद्धा गाडीच्या पाठीमागील चाकाला जोरदार धडक बसल्याने गाडीची पलटी झालेली होती व धडक देणारी गाडी डिव्हायडरच्या शेजारी जाऊन थांबलेली होती.

पाठीमागून धडक दिलेली गाडी महिला चालवत असल्याचे समजले. सदरच्या ठिकाणी वेळापूर पोलीस स्टेशन अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने येऊन पडलेली गाडी उभा केली व मध्यभागी असणारी गाडी क्रेनच्या साह्याने बाजूला घेतलेली आहे. दोन्हीही गाडीतील व्यक्तींना वेळापूर आयसीयू दवाखान्यामध्ये घेऊन गेलेले आहेत.

श्रावण महिन्यात देवदर्शनासाठी अनेक कुटुंब जात असतात. अशावेळी वाहन चालकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. वळण किंवा एकेरी रस्ता पाहून वाहनाची गती ठरवली पाहिजे. आजचा अपघात पाठीमागून येणाऱ्या गाडीमुळे झालेला आहे. सदर ठिकाणी रस्ता सरळ होता वळण नव्हते तरीसुद्धा गाडीचा स्पीड जास्त असावा, असा अंदाज उपस्थित असलेल्या लोकांनी केलेला आहे. मात्र, धडक दिलेली गाडी पडलेली होती.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom