गोरडवाडी गावात खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मतदानाच्या आकडेवारीवर बोकडाची पैज…
गोरडवाडी (बारामती झटका)
देशात व राज्यात बहुचर्चित असणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये लढत झाल्यानंतर ४ जुन रोजी मतमोजणी आहे. तोपर्यंत वाड्यावस्त्यावर व गावागावात अनेक पैजा लागलेल्या आहेत. माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी गावामध्ये माजी सरपंच रामभाऊ गोरड आणि वस्ताद भारत सरगर यांच्यामध्ये मतदानाच्या आकडेवारीवरून बोकडाची पैज लागलेली आहे.
माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माळशिरस तालुक्यातून ७०,००० मते मिळतील, असा अंदाज गोरडवाडीचे माजी सरपंच रामभाऊ गोरड यांनी सांगितले. त्यावर वस्ताद भारत सरगर यांनी एवढी मते पडणार नाहीत जर, ७० हजार मते पडली तर बोकड देणार आणि जर ७० हजारापेक्षा एक मत जरी कमी पडले तर सरपंच रामभाऊ गोरड बोकड देणार, अशी पैज गोरडवाडी गावचे माजी पोलीस पाटील मल्हारी कर्णवर पाटील यांच्या निवासस्थानी ठरलेली आहे.
यावेळी कण्हेर गावचे युवा नेते धर्मराज माने पाटील, उद्योजक महादेवजी यमगर, नामदेव दादासाहेब हुलगे, अंकुश गोरड, भांबुर्डीचे महादेव वाघमोडे पाटील, यांच्यासह २५ ते ३० लोक उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.