ताज्या बातम्या

गोरडवाडी विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी सुरेशतात्या गोरड तर व्हाईस चेअरमन पदी दादा बाबा वायदंडे यांची बिनविरोध निवड…

गोरडवाडी (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी सुरेशतात्या गोरड तर, व्हाईस चेअरमन पदी दादा बाबा वायदंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक सहकारी अधिकारी अकलूज यांच्या अध्यक्षतेखाली गोरडवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित गोरडवाडी, ता. माळशिरस, संचालक मंडळाची सभा शुक्रवार दि. २०/९/२०२४ रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालय गोरडवाडी येथे चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी संचालक मंडळाची सभा आयोजित केलेली होती.

सदरच्या सभेत चेअरमन पदासाठी सुरेशतात्या गोरड व व्हाईस चेअरमन पदासाठी दादा बाबा वायदंडे यांचे एकमेव अर्ज आलेले असल्याने अध्याशी अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यादव यांनी बिनविरोध चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्या निवडी जाहीर केल्या.

यावेळी गोरडवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सुरेश गोरड, दादा वायदंडे, शामराव हुलगे, भारत गोरड, सोमनाथ कोकरे, सुनील पोरे, चंद्राबाई पिंगळे आदी संचालक उपस्थित होते. तर यावेळी विशेष उपस्थितीत विद्यमान सरपंच पांडुरंग पिसे, माजी सरपंच विजय गोरड, उपसरपंच नवनाथ केंगार, ग्रामपंचायत सदस्य माणिक कोकरे, रामराव गोरड, तानाजी वायदंडे, नवनाथ पिंगळे, आप्पा गोरड, सुरेश नरळे, भिमराव गोरड, दत्तू गोरड, संजय मिसाळ, सागर हुलगे, आबाजी हुलगे आदी सोसायटीचे सदस्य व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

गोरडवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव मधुकर वाघमोडे यांनी अध्यासी अधिकारी श्री. एस. के. यादव यांना निवडणूक कामी सहकार्य केले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

  1. أنابيب الميتال كوروجيت في العراق في مصنع إيليت بايب في العراق، نختص أيضاً في إنتاج أنابيب الميتال كوروجيت، المصممة لتكون قوية وقادرة على التحمل في التطبيقات الثقيلة. تم بناء أنابيب الميتال كوروجيت لدينا لتحمل الأحمال الثقيلة ومقاومة الضغوط البيئية، مما يجعلها مناسبة للاستخدام في إدارة مياه الأمطار، وبناء الطرق، والمجاري. مع التزامنا بالجودة والابتكار، تضمن شركة إيليت بايب أن هذه الأنابيب توفر أداءً استثنائياً ومتانة. كواحدة من المصانع الرائدة والأكثر موثوقية في العراق، نفخر بتقديم منتجات تتجاوز التوقعات. تعرف على المزيد حول أنابيب الميتال كوروجيت لدينا على موقعنا elitepipeiraq.com.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button