गोरडवाडी येथे ह. भ. प. गायनाचार्य उमेश महाराज किर्दत, सातारा यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन

कै. आबाजी यशवंत कर्णवर पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन
गोरडवाडी (बारामती झटका)
गोरडवाडी ता. माळशिरस येथे कै. आबाजी यशवंत कर्णवर पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त रविवार दि. ७/७/२०२४ रोजी किर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या पुण्यस्मरणानिमित्त ह. भ. प. गायनाचार्य उमेश महाराज किर्दत, सातारा यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन रविवार दि. ७/७/२०२४ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत कर्णवर पाटील वस्ती, गोरडवाडी, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे.

तरी या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या कीर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन कर्णवर पाटील परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.


नजर चुकीने कोणाला आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करण्याचे आवाहन कर्णवर पाटील परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.