गोरडवाडीचे ग्रामदैवत बिरोबा देवाच्या प्रांगणात खेळ व गजी ढोल कार्यक्रमाचे नेटके नियोजन…

गोरडवाडी गावातील समविचारी बिरोबा भक्तांनी सामूहिक कार्यक्रमाचे नियोजन करून जंगी भोजन मेजवानीचे आयोजन..
गोरडवाडी (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी गावचे ग्रामदैवत बिरोबा मंदिर आहे. कुलदैवत असणाऱ्या बिरोबा मंदिराच्या ठिकाणी अनेकजण आपले धार्मिक कार्यक्रम करीत असतात. गोरडवाडीचे ग्रामदैवत बिरोबा देवाच्या प्रांगणामध्ये गावातील समविचारी बिरोबा भक्तांनी सामूहिक गजी ढोल व खेळाचे नेटके नियोजन करून ४० बकऱ्यांचे जंगी भोजनाच्या मेजवानीचे आयोजन केलेले असल्याचे गोरडवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान कर्तव्यदक्ष सदस्य श्री. मच्छिंद्र गोरड सर यांनी बारामती झटकाशी बोलताना सांगितले.

पुढे बोलताना युवा नेते श्री. मच्छिंद्र गोरड सर यांनी सांगितले, गावचे कुलदैवत असणारे बिरोबा मंदिर या ठिकाणी समविचारी सर्वांनी मिळून कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि. 28/07/2024 रोजी केलेले आहे. त्यामध्ये बापू बाबा गोरड, मच्छिंद्र शिवाजी गोरड सर, बाळू अगतराव गोरड मामा महादेव गोरड, दादा अज्ञान गोरड, जगन्नाथ भीमराव गोरड, अण्णा रामचंद्र गोरड, तानाजी ज्ञानदेव कोळेकर, तानाजी विठोबा यमगर, भानुदास वीरा गोरड, हनुमंत महादेव यमगर, मच्छिंद्र भीमराव सुरवसे, संजय लक्ष्मण सरगर, महादेव अंकुश गोरड, भागवत मल्हारी कर्णवर अशा बिरोबा भक्तांनी एकत्र येऊन कार्यक्रमाचे आयोजन सर्वांनी मिळून केलेले आहे.
तरी गोरडवाडी व पंचक्रोशीतील मित्रपरिवार, नातेवाईक यांनी सदरच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन सर्वांच्यावतीने गोरडवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान कर्तव्यदक्ष सदस्य श्री. मच्छिंद्र शिवाजी गोरड सर यांनी केलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.