गोरेवस्ती, मारकडवाडी येथे हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

मारकडवाडी (बारामती झटका)
मारकडवाडी, ता. माळशिरस येथे सालाबाद प्रमाणे याहीवर्षी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन मंगळवार दि. ८ एप्रिल २०२५ ते शनिवार दि. १२ एप्रिल २०२५ या कालावधीत श्री क्षेत्र वश्या मारुती देवस्थान, हनुमान नगर, मारकडवाडी, गोरेवस्ती, ता. माळशिरस करण्यात आले आहे. मारकडवाडी येथे नवसाला पावणारा श्री वश्या मारुती आहे. अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. यादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दि. ०८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ५.०० ते ६.०० रुद्र अभिषेक (सावित्री नदी जल – महाड), सकाळी ६.०० ते ६.३० महाआरती (धूपआरती), रात्री ८.३० ते ९.०० महाआरती (सांजआरती), रात्री ९.०० ते ९.३० प्रसाद (अन्नदाते- गायकवाड, राऊत, शिंदे व भुजबळ वस्ती, हनुमान नगर), रात्री ९.३० ते ११.०० भजन (जागर) असा कार्यक्रम होणार आहे.
बुधवार दि. ०९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ५.०० ते ६.०० रुद्र अभिषेक (गायत्री नदी जल महाबळेश्वर), सकाळी ६.०० ते ६.३० महाआरती (धूपआरती), रात्री ८.३० ते ९.०० महाआरती (सांजआरती), रात्री ९.०० ते ९.३० प्रसाद (अन्नदाते – गोरे वस्ती, हनुमान नगर), रात्री ९.३० ते ११.००, भजन (जागर) असा असणार आहे.
गुरुवार दि. १० एप्रिल २०२५ रोजी सकाळी ५.०० ते ६.०० रुद्र अभिषेक (कोयना नदी जल कराड), सकाळी ६.०० ते ६.३० महाआरती (धूपआरती), रात्री ८.३० ते ९.०० महाआरती (साजआरती), रात्री ९.०० ते ९.३० प्रसाद (अन्नदाते- बोराटे, वाघोले, वाघमोडे वस्ती, हनुमान नगर), रात्री ९.३० ते ११.०० भजन (जागर) असा असणार आहे.

शुक्रवार दि. ११ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ५.०० ते ६.०० रुद्र अभिषेक (वेण्णा नदी जल-मेढा), सकाळी ६.०० ते ६.३० महाआरती (धूपआरती), रात्री ७.३० ते ८.०० महाआरती (सांजआरती), रात्री ८.०० ते ९.०० प्रसाद (अन्नदाते- मारकडवाडी व मेडद ग्रामस्थ, हनुमान नगर, रात्री ९.०० ते ११.०० गीत झंकार गुंजन संध्या (प्रशांत सर्वदे सर, संगीत विशारद असा कार्यक्रम असणार आहे.
शनिवार दि. १२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ४.०० ते ०५.१५ रुद्र अभिषेक, षोडशोपचार पूजा (कृष्णा नदी जल – संगममाहुली, सातारा), सकाळी ५.१५ ते ०६.१७ भजन, सकाळी ६.२६ जन्मोत्सव कार्यक्रम, सकाळी ०७.०० ते ११.०० महाप्रसाद (जय बजरंग बली तरुण मंडळ, हनुमान नगर), रात्री ८.३० ते ०९.००, महाआरती (सांजआरती) असा कार्यक्रम असणार आहे.
तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी व ग्रामस्थांनी या जन्मोत्सव सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.