ग्राहक बनून आले अन् अडीच लाखांचा नेकलेस केला लंपास…
पणजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल
सिंधुदुर्ग (बारामती झटका)
श्री. दिनेश शांताराम मयेकर,
सामाजिक कार्यकर्ते व समाजसेवक तिरोडा (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) सांतिनेझ (पणजी) येथील पीएनजी गाडगीळ ज्वेलर्समध्ये ग्राहक बनून आलेल्या दोघांनी हातोहात सुमारे अडीच लाखांचा सोन्याचा नेकलेस लंपास केला. सदर घटना मंगळवार दि. 25 जून 2024 रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली. मात्र, रात्री दागिने ठेवताना मोजताना हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी ज्वेलरी शोरूमच्या व्यवस्थापक यशवंत भिडे यांनी पणजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन तरुण काल दुपारी शोरूममध्ये आले. त्यांनी विविध डिझाईनचे नेकलेस दाखवण्यास सांगितले. कर्मचारी दागिने दाखवत होते. तेव्हाच एक नेकलेस लंपास करण्यात आला. हवा तसा नेकलेस नसल्याचे सांगून ते तेथून निघून गेले. नेकलेस चोरीला गेल्याचे रात्री दागिने मोजून ठेवताना लक्षात आले. या घटनेचा अधिक तपास पोलिस तपास करत आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.