Uncategorizedताज्या बातम्यासामाजिक

ग्रामीण भागातील नकाशावर नसलेले सर्व रस्ते नकाशावर आणणार – तहसीलदार सुरेश शेजूळ

तरंगफळ (बारामती झटका) छत्रपती शिवाजी महाराज

स्वअभियानांतर्गत राष्ट्रीय नेता पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस दि. 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोंबर 2025 दरम्यान आपल्या तालुक्यात सेवा पंधरवडा अभियान सुरू असून या अभियाना अंतर्गत ग्रामीण भागातील सर्व वापरात असलेले नकाशावर नसलेले रस्ते नकाशावर आणण्याची मोहीम सुरू असून शेतकरी ग्रामस्थांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन माळशिरसचे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्री. सुरेश शेजुळ यांनी केले.

मौजे तरंगफळ येथे सेवा पंधरवडा निमित्त ग्रामसभा आयोजित केली होती, त्यावेळी शेजुळ साहेब बोलत होते. यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. ग्रामस्थांनी सुचवलेल्या रस्त्यांची माहितीबद्दल सविस्तर चर्चा करण्यात येऊन सदर रस्ते नकाशावर आणण्यासाठी नियोजन केले.

या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. पद्मिनीताई नारायण तरंगे होत्या. यावेळी माळशिरस मंडलाधिकारी विजय लोखंडे, ग्राम महसूल अधिकारी अश्विनी नागटिळक, कृषी सहाय्यक नितीन शिंदे, ग्रामविकास अधिकारी संतोष पानसरे, उपसरपंच सागर बोडरे, सामाजिक कार्यकर्ते नारायण तात्या तरंगे, दिव्यांग संघटनेचे नेते ग्रामपंचायत सदस्य गोरख जानकर, बीज उत्पादक संस्थेचे व्हाईस चेअरमन माजी सरपंच सुजित तरंगे, माजी सरपंच महादेव तरंगे, माजी संचालक जयंतीलाल तरंगे संपत साळवे, दादासो तरंगे, मानाप्पा तरंगे, अभिजीत जगताप, दादासो बागाव, अविनाश मोहिते यांचे सह अंगणवाडी, सेविका, ग्रामस्थ, कार्यकर्ते, शेतकरी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom