कृषिवार्ताताज्या बातम्यासामाजिक

ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून करमाळा तालुक्यातील खडकी व बिटरगाव (श्री) गावांना भेटी व नुकसानीची पाहणी

पूरग्रस्तांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानाची पाहणी करून पंचनामे त्वरित करण्याचे आदेश

सोलापूर (बारामती झटका)

जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यात 14 सप्टेंबर रोजी 9 महसुली मंडळात अतिवृष्टी झाली. तसेच सीना नदीला पूर येऊन खडकी, निलज, बोरगाव, तरटगाव, बिटरगाव (श्री), वाघाचीवाडी, आळजापुर, बाळेवाडी आदी गावात पुराचे पाणी शिरल्याने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी खडकी व बिटरगाव (श्री) या गावातील पूरग्रस्त भागाची पाहणी प्रत्यक्ष बांधावर जाऊन केली. तसेच झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने त्वरित करून शासनाला अहवाल सादर करावा, असे आदेशही त्यांनी दिले.

यावेळी पालकमंत्री श्री. गोरे यांनी खडकी येथे पुराच्या पाण्याच्या प्रवाहाने फुटलेल्या बंधाऱ्याची पाहणी करून येथील नुकसानग्रस्त शेतकरी श्री. लोहार यांच्याकडून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. बंधाऱ्याचे दरवाजे बंद असल्याने दोन्ही बाजूचा भराव वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे शेती पिके व मातीही खरडून वाहून गेली आहे. यावेळी त्यांनी प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे आदेश देऊन शासन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगून शेतकऱ्यांना धीर दिला. त्यानंतर पालकमंत्री श्री. गोरे यांनी बिटरगाव (श्री) येथील नुकसानीची पाहणी केली. बिटरगाव (श्री) येथील पूर्ण रस्ता पुराच्या पाण्यामुळे वाहून गेल्याची पाहणी केली. यावेळी अनेक महिलांनी पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती पालकमंत्री महोदय यांना दिली.

यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार शिल्पा ठोकडे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता सुनिता पाटील यांच्यासह केदार सावंत, गणेश चिवटे, शशिकांत पवार, जगदीश अग्रवाल, प्रा. रामदास झोळ, सूर्यकांत पाटील, कन्हैयालाल देवी, महेश चिवटे, खडकी येथील मैनाबाई लोखंडे, राणी लोखंडे, हरिभाऊ लोखंडे, प्रल्हाद लोखंडे, एकनाथ सुळ, आप्पा सुळ, कल्याण सूळ, शिवाजी सूळ, मोहन शिंदे, उपसरपंच भाऊसाहेब खरात, सरपंच उमाकांत बर्डे, माजी सरपंच बळीराम शिंदे, दिलीप सुळ, दादा विहाळे, बिटरगाव श्री. येथील भारत माने, आदिनाथ पाटील, माजी सरपंच डॉ. अभिजीत मुरूमकर, अशोक सर मुरूमकर, दौलत वाघमोडे, माजी उपसरपंच गणेश जाधव, युवराज देवकर, सचिन नलवडे, बापूराव मुरूमकर, विष्णू राजपूत, शिवाजी बोराडे, पोलीस पाटील भूषण अभिमन्यू, कैलास नलवडे, राम बोराडे, बबन दादा मुरूमकर, वसंत मुरूमकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बिटरगाव (श्री) येथे अंधार पडलेला असतानाही बॅटरीच्या साह्याने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे न भरून येणारे आहे. मात्र सरकार खंबीरपणे पाठीशी उभे राहणार आहे. येथील रस्ता, कयमस्वरूपी बंधार्‍याचा मार्ग निघावा व झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे केली जातील. त्यांना मदत दिली जाईल. या भागातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाईल. त्या बैठकीला तुम्हाला निमंत्रित केले जाईल, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बिटरगाव (श्री) येथील शेतकऱ्यांना सांगितले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom