ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांचा अहिल्यानगर, सोलापूर व मुंबई दौरा जाहीर…

सोलापूर (बारामती झटका)
ग्रामविकास व पंचायत राज मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, सोलापूर जिल्हा ना. जयकुमार गोरे यांचा मंगळवार, दि. ०६ मे २०२५ रोजीचा अहिल्यानगर, सोलापूर जिल्हा व मुंबई दौरा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सदरच्या दौरा पुढीलप्रमाणे –
मंगळवार, दि. ०६.०५.२०२५ रोजी सकाळी ०८.०० वा. शासकीय विश्रामगृह, अहिल्यानगर येथून मोटारीने माळीवाडा, अहिल्यानगरकडे प्रयाण, ०८.१५ वा. माळीवाडा येथे आगमन व आमदार मा. श्री, संग्राम जगताप यांचे निवासस्थानी सांत्वनपर भेट, ०८.३० वा. अहिल्यानगर येथून चौंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगरकडे प्रयाण, १०.०० वा. चौंडी येथे आगमन व राखीव ११.०० वा. मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महोदय यांचे समवेत मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्र. २ अंतर्गत रस्ते विकास कामाच्या भूमिपूजन समारंभास उपस्थिती (संदर्भ- श्री. पंडित खेडकर, मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे सचिव), दुपारी १२.३० वा. राज्य मंत्रीमंडळ बैठकीस उपस्थिती व राखीव, सायं. ०३.३० वा. चौंडी येथून बार्शी, जि. सोलापूरकडे प्रयाण, ०५.०० वा. शासकीय विश्रामगृह, बार्शी येथे आगमन व राखीव, ०६.०० वा. शिवाजी प्रसारक मंडळ, (ट्रामा युनिट) बार्शी येथे सदिच्छा भेट. (संदर्भ- श्री. राजेंद्र राऊत, माजी आमदार), ०६.२० वा. बार्शी येथून कांदलगाव, ता. बार्शीकडे प्रयाण, ०६.३० वा. कांदलगाव येथे आगमन व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत रस्ते विकास कामाच्या शुभारंभास उपस्थिती. (संदर्भ- श्री. राजेंद्र राऊत, माजी आमदार), ०६.५० वा. कांदलगाव येथून बार्शीकडे प्रयाण, रात्री. ०७.०० वा. बार्शी येथे आगमन व भक्तनिवास भूमिपूजन समारंभास उपस्थिती, ०८.०० वा. भगवंत महोत्सवास उपस्थिती, ०९.०० वा. शासकीय विश्रामगृह, बार्शी येथे राखीव, १०.१५ वा. बार्शी येथून कुडूवाडी, जि. सोलापूरकडे प्रयाण, ११.०० वा. कुर्डूवाडी रेल्वे जंक्शन येथे आगमन व राखीव, ११.३० वा. सिद्धेश्वर एक्सप्रेस (१२११६) रेल्वेने मुंबईकडे प्रयाण.
बुधवार दि. ०७.०५.२०२५ सकाळी ०७.०५ वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे आगमन व ‘प्रचीतीगड क-६’ शासकीय निवासस्थान, मुंबईकडे प्रयाण, ०७.२० वा. ‘प्रचीतीगड क – ६’ शासकीय निवासस्थान, मुंबईकडे येथे आगमन व राखीव असा असणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.