ताज्या बातम्याराजकारण

ग्रामविकास तथा पालकमंत्री ना. श्री. जयकुमार गोरे यांचा आज रविवार सोलापूर जिल्हा दौरा जाहीर.

भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा व शहर पदाधिकारी बैठकीस प्रमुख उपस्थितीत…

बोराटवाडी (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांचा आज रविवार दि. 08/05/2025 रोजी सोलापूर जिल्हा दौरा जाहीर झालेला आहे.

पालकमंत्री महोदय सकाळी 10:30 वाजता बोराटवाडी ता. माण जि. सातारा येथील कमलकुंज येथून शासकीय मोटारीने म्हसवड मार्गे सोलापूर शासकीय विश्रामगृहाकडे जाणार आहे. दुपारी 02 वाजता भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर व जिल्हा पदाधिकारी बैठकीस प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत. बैठकीनंतर शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे राखीव आहेत. असा दौरा स्वीय सहाय्यक अभिजीत काळे यांनी जाहीर केलेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button