ताज्या बातम्या

ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री ना. योगेश कदम यांचे स्वीय सहाय्यक पदी श्री. हनुमंत वगरे यांची नियुक्ती..

सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे पंचायत समिती माळशिरसचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांना ग्रामपंचायत अधिकारी श्री. हनुमंत वगरे यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश..

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री ना. योगेश ज्योती रामदास कदम यांनी सोलापूर जिल्हा परिषद यांच्याकडे पत्राद्वारे कळविलेले होते कि, श्री. हनुमंत संपत वगरे हे ग्रामपंचायत अधिकारी या पदावर पंचायत समिती माळशिरस येथे कार्यरत आहेत. श्री. वगरे यांची माझ्या राज्यमंत्री कार्यालयाच्या आस्थापनेवर उसनवारी तत्त्वावर स्वीय सहाय्यक या पदावर दि. ०६/०२/२०२५ (म.पु.) पासून नियुक्त करीत आहेत. तरी श्री. हनुमंत संपत वगरे यांच्या नियुक्तीचे आदेश निर्गमित करून त्यांना कार्यमुक्त करावे.

राज्यमंत्री ना.श्री. योगेश कदम यांच्या पत्रान्वये सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांना ग्रामपंचायत अधिकारी श्री. हनुमंत संपत वगरे यांना कार्यमुक्त केल्याचा आदेश देण्यात आलेला आहे.

श्री. हनुमंत संपत वगरे यांचे मूळ गाव वटपळी, कोंडबावी ता. माळशिरस आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे १९९९ साली एमएससी ॲग्री शिक्षण पूर्ण करून ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. सध्या माळशिरस पंचायत समितीमध्ये पिरळे या गावात ग्रामपंचायत अधिकारी पदावर कार्य करीत होते. त्यांच्याकडे बांगर्डे गावचा अतिरिक्त पदभार होता. ग्रामपंचायत प्रशासनात गेली वीस वर्ष कार्यरत असल्याने प्रशासनातील दांडगा अनुभव आहे. तसेच माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान या सेवा भावी संस्थेचे सहसचिव म्हणून काम करत आहेत. त्याचा फायदा स्वीय सहाय्यक पदावर काम करताना होणार आहे. प्रामाणिकपणे, इमाने इतबारे, लोकाभिमुख प्रशासनातील सेवेमुळे त्यांना स्वीय सहाय्यक पदावर काम करण्याची संधी मिळालेली आहे.

सुसंस्कृत व सौजन्यशील श्री. हनुमंत वगरे भाऊसाहेब यांना भावी कारकिर्दीस बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्या वतीने खूप खूप हार्दिक शुभेच्छा आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button