गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर माळशिरस येथे टेळे जनरल हॉस्पिटल चा उद्घाटन समारंभ होणार

आ. उत्तमराव जानकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न होणार
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथे टेळे नेत्र रुग्णालय येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर टेळे जनरल हॉस्पिटल या नवीन जनरल हॉस्पिटलचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रविवार दि. ३०/३/२०२५ रोजी सायंकाळी ५ वा. टेळे नेत्र रुग्णालय व जनरल हॉस्पिटल, पुणे-पंढरपूर रोड, बाजारतळ, माळशिरस, येथे होणार आहे. माळशिरस विधानसभेचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या शुभहस्ते तर माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, माजी सरपंच सौ. संजीवनीताई पाटील, श्री. शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगरचे व्हाईस चेअरमन मिलिंद कुलकर्णी, माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विजय देशमुख, लोणंद-पंढरपूर रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ अण्णा वाघमोडे, डॉ. सचिन पुराणिक बी. ए. एम. एस. आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन संपन्न होणार आहे.

उद्घाटनाच्या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. तरी या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन भिवाजी तुळशीराम टेळे (सर), बापूराव तुळशीराम टेळे, डॉ. आकाश बापूराव टेळे (जनरल फिजिशियन) व समस्त टेळे परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.