गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाच घेताना पोलीस निरीक्षकासह महीलेला रंगेहात पकडले

धाराशिव (बारामती झटका)
धाराशिव येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून 95 हजार रु. लाच घेताना पोलीस निरीक्षकासह एका महिलेला रंगेहात पकडले आहे. मुक्ता प्रकाश लोखंडे, मपोना 1671 पोस्टे धाराशिव ग्रामीण यांनी मारोती शेळके पोलीस निरीक्षक यांचेकरिता लाचमागणी करून लाच रक्कम स्वतः स्वीकारली असल्याने त्यांचे विरोधात भ्र. प्र. अधिनियम 1988 चे कलम 7, 7 अ प्रमाणे व मारोती निवृत्ती शेळके पोलीस निरीक्षक, पोस्टे धाराशिव ग्रामीण यांनी सदरची लाच रक्कम स्विकारण्यास प्रोत्साहन दिल्याने त्यांचे विरोधात भ्र. प्र. अधिनियम 1988 चे कलम 12 प्रमाणे पोस्टे आंनदनगर, धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे..
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मारोती निवृत्ती शेळके (वय 54 वर्षे, पोलीस निरीक्षक, पोस्टे धाराशिव ग्रामीण वर्ग – 1, रा. जीवन कुलकर्णी यांचे घरी भाडयाने, महात्मा गांधी नगर, धाराशिव, मुळ रा. घर नंबर 1008 काबरा नगर, नांदेड) आणि मुक्ता प्रकाश लोखंडे (वय 34 वर्षे, मपोना/ 1671 पोस्टे धाराशिव ग्रामीण रा. शिवसृष्टी नगर, धाराशिव.) यांनी तक्रारदार यांच्या मुलाची गुन्ह्यात मदत करण्यासाठी मुक्ता लोखंडे यांनी मारोती शेळके, पोलीस निरीक्षक यांच्यासाठी व स्वतः साठी 1 लाख रुपयांचे लाचेची मागणी केली होती.
तक्रारदार यांच्या तक्रारीनंतर दि. 25/06/2025 रोजी शासकीय पंचासह मारोती शेळके, पोलीस निरीक्षक, पोस्टे धाराशिव ग्रामीण यांची त्यांच्या पोलीस स्टेशन येथे भेट घेऊन कामासंदर्भात चर्चा केली असता सदर चर्चेत त्यांनी मुक्ता लोखंडे हिला भेटण्यास सांगितले. सदर वेळी आलोसे मुक्ता लोखंडे यांनी तक्रारदार यांचेकडे पोलीस निरीक्षक मारोती शेवाळे यांच्यासाठी 1 लाख रुपयाची मागणी करुन तडजोडीअंती 95 हजार रुपये लाचेची रक्कम दि. 25/06/2025 रोजी शासकीय विश्रामगृह, धारशिव येथे स्वीकारण्याचे कबूल केल्याचे निष्पन्न झाले.
लाचमागणी पडताळणी अंती आज दि. 25/06/2025 रोजी शासकीय विश्रामगृह, धाराशिव च्या समोर शासकिय पंच यांचे समक्ष तक्रारदाराकडुन लाच स्विकृती सापळा कारवाईचे नियोजन केले असता तक्रारदार यांच्याकडून आलोसे श्रीमती मुक्ता लोखंडे यांनी लाचेची 95000/- हजार रक्कम स्वीकारली असता रंगेहाथ महिला पंच समक्ष करवी ताब्यात घेण्यात आले आहे.
यावेळी आरोपीतांची घरझडती सुरू असून त्यांच्या अंगझडतीआलोसे शेळके यांच्याकडे एक विवो कंपनीचा व एक मोटोरोला कंपनीचा मोबाईल मिळून आला. तर आलोसे लोखंडे यांच्याकडे एक ओपो कंपनीचा मोबाईल, एक बजाज कंपनीची मोटारसायकल, त्यांची चावी व ओळखपत्र मिळून आले. त्या दोघांकडील मोबाईल जप्त केले असुन त्यांचे विश्लेषण सुरु आहे.
ही कारवाई सापळा अधिकारी श्री. योगेश वेळापुरे, पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि धारशिव आणि सहायक सापळा अधिकारी बाळासाहेब नरवटे, पोलीस निरीक्षक, लाप्रवि धाराशिव यांच्या विभागाने श्री. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर, श्री.मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथक पोलीस अमंलदार नागेश शेरकर, पोलीस अमंलदार शशीकांत हजारे यांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर धाराशिव पोलीस स्टेशनच्या वतीने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांचेकडे कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ संपर्क साधावा.
भ्रष्टाचारासंबंधित काही तक्रार असल्यास
टोल फ्री क्र :- 1064 पोलीस उप अधीक्षक, धाराशिव :- 02472- 222879 वर संपर्क साधावा.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.