गुरसाळे येथील सौ. द्वारकाबाई अर्जुन गायकवाड यांचे दुःखद निधन…

श्री काळभैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या ज्येष्ठ संचालिका सौ. द्वारकाबाई गायकवाड यांचे निधन…
गुरसाळे (बारामती झटका)
गुरसाळे ता. माळशिरस, येथील श्री काळभैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या ज्येष्ठ संचालिका सौ. द्वारकाबाई अर्जुन गायकवाड यांचे वयाच्या 75 व्या वर्षी रविवार दि. 23/03/2025 रोजी दुपारी 04 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पती अर्जुन येदु गायकवाड, दोन मुले राजेंद्र व मोहन, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
गुरसाळे गावातील एक प्रतिष्ठित राजकीय कुटुंबातील त्या प्रमुख होत्या. गुरसाळे ग्रामपंचायतीमध्ये पती व सुनेने सदस्य पदाचा पदभार सांभाळलेला होता. सध्या श्री काळभैरवनाथ सेवा सोसायटीच्या विद्यमान जेष्ठ संचालिका होत्या. त्यांचा स्वभाव सुसंस्कृत व धार्मिक होता.
सर्वांशी मिळून मिसळून असणाऱ्या द्वारकाबाई गायकवाड यांच्या दुःखद निधनाने गायकवाड परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांच्यावर आजच रात्री 11 वा. 88 चाळ, गुरसाळे येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.