नेते, कार्यकर्ते व जनतेला विश्वासात घेऊन गावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार – नूतन उपसरपंच गौरव लहू मोरे
गुरसाळे ( बारामती झटका)
गुरसाळे ता. माळशिरस या ग्रामपंचायतीचे उपसरपंच शंकर भानुदास चव्हाण यांनी राजीनामा दिलेल्या रिक्त पदावर गौरव लहू मोरे यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड झालेली आहे. थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच सागर सर्जेराव खिलारे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस. व्ही. जाधव यांच्या उपस्थितीत उपसरपंच पदाची निवडणूक संपन्न झाली. यावेळी सरपंच सागर सर्जेराव खिलारे, मावळते उपसरपंच शंकर भानुदास चव्हाण, नूतन उपसरपंच गौरव लहू मोरे, ग्रामपंचायत सदस्य अतुल अरुण पवार, दिपाली रमेश चव्हाण, पूजा सागर कोरटकर, वैशाली सोमनाथ झेंडे, सुनिता सोमनाथ गायकवाड, मंगेश राजेंद्र खांडे, नकुसा तात्या जेडगे, चांगदेव दादू खिलारे, विजया दिलीप रायते, अमोल पोपट झेंडे, आनंदी मोहन घाडगे आदी उपस्थित होते. ग्रामसेविका पी. एच. गायकवाड मॅडम यांनी निवडणूकीसाठी सहकार्य केले.
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते, शिवामृत दूध संघाचे चेअरमन भाजपचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुरसाळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी पाटील व कोरटकर दोन्ही गट एकत्र येऊन निवडणूक लढविलेली होती. त्यामध्ये थेट जनतेतील सरपंच सागर सर्जेराव खिलारे व ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेले होते. दोन्ही पार्टीतील जेष्ठ नेते व पार्टी प्रमुख यांनी सर्व घटकांना समाविष्ट करण्यासाठी ठराविक कालावधीसाठी फेरबदल करावयाचे ठरलेले होते. ठरल्याप्रमाणे शंकर भानुदास चव्हाण यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आलेला असल्याने बिनविरोध उपसरपंच पदी गौरव लहू मोरे यांची निवड निवडणूक निर्णय अधिकारी एस. व्ही. जाधव यांनी जाहीर केलेली आहे. बिनविरोध उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतीशबाजी व गुलालाची उधळण केलेली होती. यावेळी दोन्हीही पार्टीतील प्रमुख नेते व कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावातील दोन्ही पार्टीतील प्रमुख नेते यांनी माझ्यावर विश्वास टाकून माझी उपसरपंच पदी निवड केलेली आहे. गावामध्ये जनतेला विश्वासात घेऊन सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यामध्ये समन्वय ठेवून गावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे नूतन उपसरपंच गौरव लहू मोरे यांनी सांगितले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Very informative and funny! For those curious to know more, check out: FIND OUT MORE. Let’s discuss!
This article had me laughing and learning! For those interested, check out: DISCOVER HERE. What’s your take?