ताज्या बातम्यासामाजिक

ह. भ. प. अभिमन्यू कदम महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे माळशिरस, जानकर प्लॉट येथे आयोजन


कै. तुषार वाघमोडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमीत्त कीर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस येथे कै. तुषार मोहन वाघमोडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाचे आयोजन शुक्रवार दि. 16/5/2025 रोजी आचार्य गुरुकुलम कॅम्पस, माळशिरस-पिलीव रोड, माळशिरस, जानकर प्लॉट शेजारी करण्यात आले आहे. या पुण्यस्मरणानिमित्त ह. भ‌. प. अभिमन्यू कदम महाराज श्री ज्ञानमंदिर वारकरी शिक्षण संस्था, दहिगाव यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कीर्तनानंतर आरती, पुष्पगुच्छ व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या पुण्यस्मरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. सौ. सुवर्णा मोहन वाघमोडे व डॉ. श्री. मोहन विठ्ठल वाघमोडे व समस्त वाघमोडे परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

तरी नजरचुकीने आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून पुण्यस्मरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त वाघमोडे परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button