ह. भ. प. अमोल महाराज सूळ, यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे गोरडवाडी येथे आयोजन

कै. दत्तु गोरड यांच्या पुण्यस्मरण निमित्त किर्तन, आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन
गोरडवाडी (बारामती झटका)
गोरडवाडी, ता. माळशिरस येथे कै. दत्तु संतू गोरड यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे आयोजन रविवार दि. १३/४/२०२५ रोजी गोरडवाडी, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. या पुण्यस्मनानिमित्त ह. भ. प. अमोल महाराज सुळ, मोरोची यांच्या सूत्राने कीर्तनाचे आयोजन सकाळी १० वा. करण्यात आले आहे. यावेळी कीर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या पुण्यस्मरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त गोरड परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नजरचुकीने आपणांस आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे आवाहन गोरड परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.