मोहिते पाटील यांना भाजपकडून पुन्हा हुलकावणी, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा अकलूज येथील दौरा रद्द झाला.

कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेचे कृष्णा फ्लड डायव्हर्शनमध्ये रूपांतर झाले तसे नियोजित दौऱ्याचे रूपांतर झाले असावे..
माळशिरस (बारामती झटका)
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पहिल्यांदाच प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर माळशिरस तालुक्यात अकलूज येथे नियोजित कार्यक्रमानिमित्त दौरा होता. मात्र, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा अकलूज येथील दौरा रद्द झालेला असल्याने मोहिते पाटील यांना भाजपकडून पुन्हा हुलकावणी, अशा चर्चेला राजकीय वर्तुळामध्ये उधाण आलेले आहे.
श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर या साखर कारखान्याचे चेअरमन व विधान परिषदेचे भाजपचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या उपस्थितीत सदाशिवनगर येथे कारखाना विस्तारीकरण कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. सदरच्या कार्यक्रमात माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे निमंत्रण पत्रिकेत नाव जाणीवपूर्वक टाळलेले होते. सदरच्या कार्यक्रमाविषयी उलटसुलट समाज माध्यमांमधून चर्चा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी नियोजित कार्यक्रम रद्द केलेला होता, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती.
सदरच्या चर्चेची धूळ खाली बसते न बसते तोच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा अकलूज येथील नियोजित दौरा रद्द झालेला आहे. सदरच्या दौऱ्याच्या नियोजित बैठका शिवरत्न बंगला, अकलूज व शासकीय विश्रामगृह, माळशिरस येथे संपन्न होणार होत्या. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नियोजित दौऱ्याने धैर्यशील मोहिते पाटील यांचे माढा लोकसभेचे भावी खासदारच, असे फलक तालुक्यात झळकलेले होते. याचीही भाजपच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा झालेली असणार आहे, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
सदरच्या बैठकांविषयी समाज माध्यमांमध्ये वेगळी चर्चा सुरू होती. अचानक प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा नियोजित दौरा रद्द झालेला असल्याने कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेचे कृष्णा फ्लड डायव्हर्शनमध्ये रूपांतर जसे झाले, तसे नियोजित दौऱ्याचे रूपांतर झाली असल्याची चर्चा विरोधी गटांमध्ये सुरू झालेली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा दौरा रद्द झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा अकलूज दौरा रद्द झालेला असल्याने मोहिते पाटील यांना भाजपकडून पुन्हा हुलकावणी दिली असल्याची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.