ह. भ. प. गायनाचार्य दत्तात्रय महाराज गलांडे, लासुर्णे यांचे मारकडवाडी येथे सुश्राव्य कीर्तन होणार…
मारकडवाडी गावचे प्रगतशील बागायतदार स्वर्गीय श्री. राऊ भिका दडस यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन….
मारकडवाडी (बारामती झटका)
मारकडवाडी ता. माळशिरस, येथील प्रगतशील बागायतदार स्वर्गीय श्री. राऊ भिका दडस यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त बुधवार दि. 08/01/2025 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये ह. भ. प. गायनाचार्य दत्तात्रय महाराज गलांडे, लासुर्णे यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. कीर्तनानंतर पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी वश्या मारुती मंदिर, दडसवस्ती, मारकडवाडी येथे उपस्थित रहावे, असे श्री. दत्तात्रय राऊ दडस, श्री शंकर राऊ दडस, श्री. गोरख राऊ दडस व समस्त दडस परिवार यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.
प्रथम पुण्यस्मरण (वर्षश्राद्ध) असल्याने घाईगडबडीत मित्रपरिवार व नातेवाईक यांना सदर कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले नसल्यास हेच निमंत्रण समजून आमचे वडील स्वर्गीय श्री. राऊ भिका दडस यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. त्यानिमित्त आपण उपस्थित राहावे, असे दडस परिवार यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.