ह. भ. प. गुरुवर्य बापूसाहेब महाराज मोरे देहूकर यांचे मळोली येथे सुश्राव्य कीर्तन होणार..

मळोली गावचे युवा नेते स्वर्गीय अरुणसिंह (अण्णा) फत्तेसिंह जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन….
मळोली (बारामती झटका)
शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय माळेवाडी, अकलूज महाविद्यालयाचे माजी जनरल सेक्रेटरी मळोली गावचे युवा नेते प्रगतशील बागायतदार स्वर्गीय अरुणसिंह (आण्णा) फत्तेसिंह जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. त्यांचे प्रथम पुण्यस्मरण मंगळवार दि. 17/06/2025 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये देहू संस्थानचे माजी अध्यक्ष व श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज ह. भ. प. गुरुवर्य बापूसाहेब महाराज मोरे देहूकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन मळोली ता. माळशिरस येथे केलेले आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे, असे चि. राजदीप अरुणसिंह जाधव, चि. धनराजसिंह अरुणसिंह जाधव, श्री. मनोजकुमार फत्तेसिंह जाधव, श्री. रणजीतसिंह जयसिंगराव जाधव, श्री. सत्यजित जयसिंगराव जाधव व समस्त जाधव परिवार, मळोली यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

स्वर्गीय अरुणसिंह (आण्णा) जाधव मित्रपरिवार व जाधव परिवार यांच्या वतीने पुण्यस्मरण निमित्त सोमवार दि. 16/06/2025 रोजी सकाळी 09 ते 05 या वेळेत रक्तदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी करून आवश्यक असणाऱ्यांना चष्मा वाटप करण्यात येणार आहे. सदरचे रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिर मळोली ग्रामपंचायत सभागृह, मळोली, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. तरी सर्वांनी रक्तदान शिबिर व नेत्र तपासणीमध्ये सहभागी होऊन प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या कीर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादासाठी उपस्थित राहावे, असे समस्त जाधव परिवार मळोली यांच्या वतीने उपस्थित राहण्याची नम्र विनंती करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.