ह. भ. प. श्री. गुरुवर्य बापूसाहेब महाराज मोरे देहूकर यांचे मळोली, पवार वस्ती येथे सुश्राव्य कीर्तन होणार

वै. ह. भ. प. जयसिंग पवार यांच्या पुण्यस्मरणनिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन
मळोली (बारामती झटका)
मळोली, ता. माळशिरस येथे वैकुंठवासी ह. भ. प. जयसिंग भागवत पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे आयोजन मंगळवार दि. १०/०६/२०२५ रोजी मळोली, पवार वस्ती, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. प्रथम पुण्यस्मरण निमित्त श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज ह. भ. प. श्री. गुरुवर्य बापूसाहेब महाराज मोरे देहूकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कीर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

नजरचुकीने कोणाला आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त पवार परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.