ह. भ. प. समाधान महाराज शर्मा यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे सापटणे येथे आयोजन

कै. बाळासाहेब ढवळे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त मोफत डोळे तपासणी व ऑपरेशन शिबिर
कै. बाळासाहेब ढवळे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन
टेंभुर्णी (बारामती झटका)
कै. बाळासाहेब उर्फ आप्पा विठोबा ढवळे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त ह. भ. प. समाधान महाराज शर्मा यांच्या कीर्तनाचे आयोजन गुरुवार दि. ४/४/२०२४ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत विठ्ठलराव शिंदे प्रशाला सापटणे (टें.) ता. माढा, येथे करण्यात आले आहे. यावेळी गायन गंधर्व, संगीत अलंकार ह. भ. प. ओंकार महाराज जगताप यांची गायनात साथ मिळणार आहे तर, ह. भ. प. विठ्ठल (बापू) माळी यांची पखवाजाची साथ मिळणार आहे.
तसेच ओम आय केअर टेंभुर्णी, श्री टेके आय क्लिनिक सांगली, पाटील हॉस्पिटल एक्सीडेंट, आयसीयू अँड ऑर्थोपेडिक सेंटर व स्वामी समर्थ सेवाभावी संस्था सापटणे (टें.) यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत डोळे तपासणी व ऑपरेशन शिबिराचे आयोजन गुरुवार दि.४/४/२०२4 रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत विठ्ठलराव शिंदे प्रशाला सापटणे येथे करण्यात आले आहे.

तसेच यामध्ये मोफत अस्थिरोग निदान व उपचाराचे देखील आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळनेर यांच्या वतीने मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर डॉ. प्रमोद बोबडे व डॉ. शंकर बोरकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. सदर शिबिराचे आयोजन नागनाथ सावता कुबेर सरपंच ग्रामपंचायत सापटणे (टें.) आणि अमोल साहेबराव ढवळे उपसरपंच ग्रामपंचायत सापटणे (टें.) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तरी या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमास उपस्थित राहून आयोजित केलेल्या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन मदन बाळासाहेब ढवळे पाटील, तुकाराम बाळासाहेब ढवळे पाटील, ज्ञानेश्वर बाळासाहेब ढवळे पाटील, समस्त ढवळे पाटील परिवार आणि समस्त ग्रामस्थ सापटणे (टें.) यांच्या वतीने करण्यात आले आहे.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.