हडपसर येथे उपहारगृह चालकाची आत्महत्या, पाच जणांवर गुन्हा

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची मयताचे नातेवाईक भेट घेणार
हडपसर (बारामती झटका)
भाडेतत्त्वावर घेतलेले उपहारगृह सोडण्यास सांगितल्याने एकाने आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागात घडली. उपाहारगृह चालकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात हडपसर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश साखरे (४२, रा. महादेवनगर, मांजरी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या उपहारगृह चालकाचे नाव आहे. याबाबत साखरे यांची पत्नी दीपाली (३८) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गणेश भालचंद्र घुले (५०), रोहिणी संदीप तुपे (४९), प्रशांत पुजारी (३५), नीलेश उत्तम घाडगे (३२) आणि सचिन जयराम शिंदे (४५, सर्व रा. मांजरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार :
महेश साखरे यांनी मांजरी भागात उपहारगृह सुरू केले होते. उपहारगृह सुरू करण्यासाठी त्यांनी कर्ज घेतले होते. तसेच काही जणांकडून व्याजाने पैसे घेतले होते. उपहारगृह सुरू करण्यापूर्वी त्यांनी आरोपींसोबत करार केला होता. कराराची मुदत संपण्यापूर्वी आरोपींनी त्यांना उपहारगृहाचा ताबा सोडण्यास सांगितले. पैसे परत करण्यासाठी त्यांनी तगादा लावला होता. त्यांच्या त्रासामुळे महेश यांनी १० मार्च रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची मयताचे नातेवाईक भेट घेणार आहेत. अद्यापपर्यंत आरोपींना अटक केलेली नसून आरोपी बिनधास्तपणे मोकाट फिरत आहेत. सदर प्रकरणाचा तपास अधिकाऱ्यांचे हाताची घडी तोंडावर बोट अशा पद्धतीने तपास कार्य सुरू आहे. त्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळेल असे वाटत नाही, त्यामुळे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री तथा देवेंद्रजी फडणवीस यांची भेट दोन दिवसांमध्ये घेणार आहेत. जर दोन दिवसात आरोपींना अटक केली नाही तर सदरचा तपास प्रभारी अधिकारी यांच्याकडे देण्याकरिता विनंती केली जाणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.