हनुमान हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, तांदुळवाडी येथे भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

तांदुळवाडी (बारामती झटका)
हनुमान विकास मंडळ संचलित हनुमान हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तांदुळवाडी, ता. माळशिरस, येथे वै. ह. भ. प. सुखदेव (आप्पा) जनार्दन शिंदे यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन दि. २३ आणि २४ ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात आले आहे. सदर वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवार दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजता होणार असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ह. भ. प. डॉ. लक्ष्मणराव आसबे, संस्थापक, कामधेनू सेवा परिवार हे असणार आहेत. तसेच शनिवार दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ७.३० ते १२ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा शुक्रवार दि. २३/८/२०२४ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. या स्पर्धेचे विषय ज्योतिबाने ज्योत पेटवली शिक्षणासाठी सावित्री घडवली, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, माझा आवडता महापुरुष, पर्यावरण संवर्धन माझी जबाबदारी, जिंकण्यासाठी जन्म आपला हे आहे तर प्रथम क्रमांकाचे बक्षीस चंद्रकांत नामदेव पवार (कै. नामदेव दिगंबर पवार यांच्या स्मरणार्थ) देण्यात येणार असून रोख रक्कम १,५१५ रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकासाठी लक्ष्मण निवृत्ती कदम यांच्यातर्फे १०१५ रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकासाठी महादेव तुकाराम धनवडे (किसान रोपवाटिका, तांदुळवाडी) रोख रक्कम 715 रु. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, चतुर्थ व पंचम क्रमांकासाठी सुनील कदम (ओम रोपवाटिका, तांदुळवाडी) यांच्यावतीने प्रत्येकी 515 रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
इयत्ता आठवी ते दहावी शुक्रवार दि. २३/८/२०२४ रोजी सकाळी १० वाजता स्पर्धा होणार आहे. यामध्ये स्पर्धेचे विषय स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारकांचे योगदान, माझा देश मी देशाचा, छत हरवलेल्या लेकरांसाठी सिंधुताई हो.., पसायदान – भारतीय संस्कृतीचा जाहीरनामा, मोबाईल वेडी आमची पिढी हे आहे. तर प्रथम क्रमांकाचे बक्षीस चंद्रकांत नामदेव पवार नामदेव (कै. नामदेव दिगंबर पवार यांच्या स्मरणार्थ) रोख रक्कम २०१५ रू., सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस विजय केशव काकडे (काकडे रोपवाटिका, तांदुळवाडी) यांच्यावतीने रोख रक्कम १५१५ रु., सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकाचे बक्षीस सुभाष नारायण काकडे (काकडे तुफान ब्लोअर, तांदुळवाडी) यांच्या वतीने रोख रक्कम १०१५ रु., सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, चतुर्थ व पंचम क्रमांकाचे बक्षीस सज्जन शरद कदम (ओम पेट्रोलियम, तांदुळवाडी) यांच्यावतीने प्रत्येकी रोख रक्कम ५१५ रु., व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

महाविद्यालयीन खुला गट यांची स्पर्धा शनिवार दि. २४/८/२०२४ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. सदर स्पर्धेचे विषय लई अवघड हाय गड्या उमगाया बाप रं…, शब्द माझे माझ्या हातातील तलवार आहे, सावित्री ते द्रौपदी मुर्मू – स्त्री स्वातंत्र्याच्या चळवळीची वाटचाल, ज्ञानियाचा व तुकयाचा तोच माझा वंश आहे, संस्काराची विद्यापीठे हरवलीत कुठे ?, हे आहेत. तर प्रथम क्रमांकाचे बक्षीस संतोष नामदेव उघडे (कै. नामदेव दिगंबर उघडे यांच्या स्मरणार्थ) रोख रक्कम ५०१५रू., सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस राहुल दत्तू कदम (लोकमान्य रोपवाटिका, तांदुळवाडी) यांच्यावतीने रोख रक्कम ३०१५ रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकाचे बक्षीस राहुल दत्तू कदम (लोकमान्य रोपवाटिका, तांदुळवाडी) यांच्यावतीने रोख रक्कम २०१५ रू., सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र, चतुर्थ व पंचम तसेच उत्तेजनार्थ डॉ. राहुल राजेंद्र मिले, (मिले हॉस्पिटल, तांदुळवाडी) यांच्या वतीने प्रत्येकी १०१५ रु. व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा शनिवार दि. २४/८/२०२४ रोजी सकाळी १० वाजता होणार असून या स्पर्धेचे विषय झाडे लावा वसुंधरा वाचवा, मला हवेत आजी-आजोबा, माझे आवडते संत – संत ज्ञानेश्वर माऊली, मला पडलेलं सुंदर स्वप्न, माझे दैवत – छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस कैलास शिवाजी काकडे यांच्यावतीने रोख रक्कम १०१५ रू., सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र द्वितीय क्रमांकाचे बक्षीस नितीन विश्वंभर माने सर यांच्यावतीने रोख रक्कम ७१५ रु., सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकाचे बक्षीस आजिनाथ नारायण चव्हाण (आयडीएफसी, मॅनेजर) यांच्यावतीने रोख रक्कम ५१५ रु., सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, चतुर्थ, पंचम तसेच उत्तेजनार्थ राहुल राजशेखर उघडे यांच्यावतीने प्रत्येकी रोख रक्कम ३१५ रू., व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
तसेच यावेळी सन्माननीय पारितोषिक सोमनाथ मुरलीधर चोरमले (श्री गणेश रोपवाटिका, तांदूळवाडी) यांच्यावतीने १०,००१ रू., शिवाजी मारुती दुधाट (अध्यक्ष, हनुमान विकास मंडळ, तांदूळवाडी) यांच्यावतीने ५००१ रु., शशिकांत तुकाराम कदम (मा. उपसरपंच, तांदूळवाडी) कै. तुकाराम भीमराव कदम यांच्या स्मरणार्थ ५००१ रु., बापू शंकर बाबर (श्री स्वामी समर्थ नर्सरी, तांदुळवाडी) कै. शंकर धोंडी बाबर यांच्या स्मरणार्थ ५००१ रु., गणेश गहिनीनाथ फुलारे (श्री छत्रपती हायटेक रोपवाटिका, तांदुळवाडी) यांच्या वतीने ५००१ रु., शुभम रघुनाथ बांदल (साईराज कृषी केंद्र, तांदुळवाडी) यांच्यावतीने ३००१ रु., कांतीलाल नामदेव कदम (अमर नर्सरी, तांदुळवाडी) कै. मालन नामदेव कदम यांच्या स्मरणार्थ ३००१ रु., बळीराम सैदु जाधव (शिवनेरी रोपवाटिका, तांदुळवाडी) कै. सैदु महादेव जाधव यांच्या स्मणार्थ २००१ रु., ज्ञानेश्वर विश्वंभर कोडग, तोंडले यांच्या वतीने १००१ रु. देण्यात येणार आहे.

सदर स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी स्पर्धा प्रमुख वि. ना. साळुंखे ९५५२३८९००९, प्राथ. मुख्याध्यापिका कदम मॅडम ७३५०६७१३६३, पाचवी ते सातवी पारसे सर ७२१८३६४८९८, आठवी ते दहावी शेळके सर ९७३००७२३१४, प्राचार्य मा. मा. देवकर ९०११४५०८६० यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.