हर्षवर्धन विद्यालय हिप्परगे तळे येथे सायबर चे धडे..

क्विक हिल फॉउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” उपक्रम
हिप्परगे (बारामती झटका)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुल व क्विक हिल फॉउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये संगणकशास्त्र संकुलातील प्रविण कोळी व सिद्रामय्या स्वामी या विद्यार्थ्यांनी “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या विषयावर सेमिनार दिले. या सेमिनारमध्ये त्यांनी आजच्या ऑनलाइन युगामध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या फसवणुकीबद्दल उदाहरणाद्वारे माहिती दिली. अशा प्रकारच्या फसवणुक होऊ नये म्हणून त्याबद्दल सर्वांनी काळजी घेण्याविषयी सविस्तर माहिती दिली.
OTP कोणास सांगू नये, अनोळखी नंबर वरून आलेले फोन कॉल्सची पडताळणी करून घेणे, whatsapp व इतर सोशल मीडियावर आलेल्या मेसेजेस व लिंकची शहानिशा करावी व त्यानंतरच पुढील प्रक्रिया करावी. पासवर्ड स्ट्रॉंग वापरून आपली माहिती सुरक्षीत करावी. तसेच आपली माहिती हि आपली जबाबदारी आहे असे सांगितले.
मोबाईल, कॉम्पुटर, लॅपटॉप इत्यादी साधनावर अधिकृत अँटीव्हायरसचा वापर करावा. या कार्यक्रमास एकूण 200 विद्यार्थी व मुध्याध्यापक आणि सर्व शिक्षक, शिक्षिका स्टाफ, गावातील युवा वैष्णव बाचुटे, सचिन पवार, विशाल रेवजे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राऊत सर यांचे मार्गदर्शन लाभले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.