हिम्मत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्यावा, चाचणीच काय डायरेक्ट परीक्षा घेऊ – माजी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख.

भविष्यात लवकरच पोट निवडणूक लागणार आहे, त्या वेळेला दूध का दूध पाणी का पाणी होईल, जस्ट वेट अँड वॉच…
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस विधानसभा 254 अनुसूचित जाती मतदार संघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांना एक लाख आठ हजारापेक्षा जास्त मताधिक्य मिळालेले असल्याने दोन्ही विरोधी गटाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत डिपॉझिट तरी राहावे यासाठी धडपड असणाऱ्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा आहे, अशी अवई देऊन निवडणूक आयोगाची थट्टा व लोकशाहीचा बाजार मांडलेला आहे. जर खरंच हिम्मत असेल तर विरोधकांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, चाचणीच काय डायरेक्ट परीक्षा घेऊ, असे भारतीय जनता पक्षाचे निमंत्रित राज्य कार्यकारणी सदस्य व माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांनी परखड मत मांडलेले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सरकारने शेतकऱ्यांना शेतीपंपाची मोफत वीज, जेष्ठ नागरिक यांना वयोश्री योजना, शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान अशा अनेक व्यक्तिगत व सार्वजनिक हिताचे निर्णय घेतलेले आहेत. सर्वात महत्त्वाचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महिलांचे जास्तीत जास्त महायुतीच्या बाजूने मतदान झालेले आहे. त्यामुळे दाजींना बरोबर घेऊन सावत्र भाऊ यांनी समाजामध्ये लोकशाही व निवडणूक आयोगाची चेष्टा लावलेली आहे.
खरंतर निवडणूक आयोग व प्रशासनाने अशा फाजील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना त्यांची जागा दाखवावी. उरला प्रश्न मतदानाचा तर भविष्यात लवकरच पोटनिवडणूक लागणार आहे. त्या वेळेला दूध का दूध, पाणी का पाणी होईल फक्त वेट अँड वॉच असा सूचक इशारा डॉ. आप्पासाहेब देशमुख यांनी केलेला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.