क्रीडाताज्या बातम्या

हिंदुह्रदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ व स्व. दत्ताआप्पा वाघमारे यांच्या पुण्यतिथीनिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान.

उपमहाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर व उपमहाराष्ट्र केसरी पै. माऊली कोकाटे आणि पै. संतोष जगताप विरुद्ध पै. संग्राम पाटील यांच्यासह अनेक नेत्रदीपक व चुरशीच्या लढती होणार …

अकलूज (बारामती झटका)

हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ व स्वर्गीय दत्ताआप्पा वाघमारे यांच्या पुण्यतिथी निमित्त शिवनेरी तालीम बागेचीवाडी व शिवसेना माळशिरस तालुका यांच्या वतीने बुधवार दि. 10/04/2024 रोजी दुपारी 03 वाजता भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान शिवनेरी तालीम जवळील भव्य पटांगणामध्ये, अकलूज-माळशिरस रोड लगत, बागेचीवाडी, अकलूज येथे संपन्न होणार आहे.

सदरच्या कुस्ती मैदानास शिवसेना नेते माजी मंत्री भास्कर जाधव, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, विधान परिषदेचे माजी आमदार रामहरी रुपनवर, शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख अनिल कोकीळ, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उत्तमराव जानकर, दि सासवड माळी शुगर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर रंजनभाऊ गिरमे, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, श्रीमंत सुधाकरपंत परिचारक सहकारी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. यशवंतराव कुलकर्णी, शिवसेना जिल्हाप्रमुख विभाग माढा धनंजय डिकोळे, शिवसेना जिल्हाप्रमुख पंढरपूर संभाजीराजे शिंदे, परीट समाज जिल्हाध्यक्ष अजय सोनटक्के, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाशराव पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य के. के. पाटील, परीट समाज ज्येष्ठ मार्गदर्शक पोपटराव दादा वाघमारे, सोलापूर जिल्हा शिवसेना समन्वयक श्री. दत्ताआबा पवार, अकलूज ग्रामपंचायत माजी सदस्य प्रमोदअण्णा कुलकर्णी, माळशिरस पंचायत समिती माजी सदस्य बाळासाहेब लवटे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्रआबा ठवरे, माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख, परीट समाजाचे उपाध्यक्ष शांतीलाल कारंडे, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य तुकाराम देशमुख, इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रदीपमामा जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष माणिकराव वाघमोडे, माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने, माळशिरस तालुका शिवसेनाप्रमुख संतोष राऊत, मनसे माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेश टेळे, युवा सेना जिल्हा युवा अध्यक्ष गणेश इंगळे चळवळीचे नेते विकास धाईंजे यांच्या शुभहस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भव्य निकाली जंगी कुस्त्यांच्या मैदानास शुभारंभ होणार आहे.

सदरच्या कुस्ती मैदानामध्ये गंगावेश तालीम कोल्हापूर, विश्वास हरगुले यांचा पठ्ठा उपमहाराष्ट्र केसरी पैलवान प्रकाश बनकर आणि जय हनुमान आखाडा पुणे, गणेश दांगट यांचा पठ्ठा उपमहाराष्ट्र केसरी पैलवान माऊली कोकाटे यांच्यात लढत होणार आहे. शिवनेरी तालीम अकलूज दत्ताआप्पा वाघमारे यांचा पठ्ठा पैलवान संतोष जगताप विरुद्ध सेवा दल पुणे पैलवान संग्राम पाटील यांच्यात लढत होणार आहे. शिवनेरी तालीम अकलूज दत्ता आप्पा वाघमारे यांचा पठ्ठा पैलवान विजय मांडवे विरुद्ध श्रीकृष्ण आखाडा सोलापूर भरत मेकाले यांचा पठ्ठा पैलवान विकास धोत्रे, शिवनेरी तालीम अकलूज दत्ता आप्पा वाघमारे यांचा पठ्ठा पैलवान विक्रम घोरपडे विरुद्ध गंगावेस तालीम कोल्हापूर विश्वास हरगुले यांचा पठ्ठा पैलवान भैरू माने, संभाजीराजे तालीम कंदर वस्ताद उमेश इंगळे यांचा पठ्ठा पैलवान सतपाल सोनटक्के विरुद्ध बेनापुर वस्ताद राजेंद्र शिंदे यांचा पठ्ठा पैलवान सागर तामखडे, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे वस्ताद काका पवार यांचा पठ्ठा पैलवान रवी चव्हाण विरुद्ध पवार तालीम मगराचे निमगाव वस्ताद गोरख पवार यांचा पठ्ठा पैलवान दत्ता बोडरे, शिवनेरी तालीम अकलूज दत्ताआप्पा वाघमारे यांचा पठ्ठा पैलवान करण मिसाळ विरुद्ध छत्रपती शिवाजीराजे आखाडा खवासपूर भरत भोसले यांचा पठ्ठा पैलवान विक्रम भोसले, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे वस्ताद काका पवार यांचा पठ्ठा पैलवान शुभम माने विरुद्ध शिवनेरी तालीम अकलूज दत्ताप्पा वाघमारे यांचा पठ्ठा पैलवान अभिनंदन यांच्यात लढत होणार आहे.

सकाळी 10 ते 02 या वेळेत कुस्त्या नेमण्यात येणार आहेत. सदरच्या कुस्ती मैदानाचे निवेदन पैलवान धनाजी मदने करणार आहेत. सदरचे कुस्ती मैदान हनुमंततात्या वाघमारे, सुभाषनाना जाधव, अकबर तांबोळी, ॲड. वीरेंद्र वाघमारे, स्वप्निलभैय्या वाघमारे, संभाजी नाना वरपे, संजय कांबळे, पैलवान बापू चव्हाण, पैलवान विक्रम राऊत, संजय बंडू सातपुते, बाळासो कोकाटे, मोहन कोकाटे, पैलवान हरिदास चव्हाण, बाळासाहेब भोसले, सचिन चौधरी, पैलवान बाळासाहेब गौसणी, दत्ता झंजे, पैलवान सुनील पवार, पैलवान शिवराज वाघमारे, पैलवान विराज वाघमारे, पैलवान संजय महाजन, शिवनेरी तालीम वस्ताद मारुती माळी, कोच ब्रिजेश यादव हरियाणा यांच्या संयोजनात होणार आहे. तरी मल्लसम्राट, वस्ताद, तमाम कुस्ती शौकीन व ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक व शिवनेरी तालमीचे वस्ताद शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष नामदेव नाना वाघमारे व मित्रपरिवार यांच्या वतीने करण्यात येत आहे. सदरचे कुस्ती मैदान ज्ञानेश्वर अस्वले यांच्या यूट्यूब चॅनलवर व संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्या बारामती झटका युट्यूब चॅनलवर लाईव्ह होणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button