हिंदुच्या भावना दुखावल्यामुळे माळशिरस पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद…
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथील अनिकेत राजेंद्र काशीद (वय १९ वर्षे) हे पाणीव येथील कॉलेजमध्ये मेकॅनिकल डिप्लोमा चे शिक्षण घेत आहे. त्यांच्या वडिलांचा हनुमान चौक, माळशिरस येथे सलूनचा व्यवसाय आहे. त्यावरच त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चालते.
आज दि. २२/०१/२०२४ रोजी आयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना असल्याने अनिकेत काशीद व त्यांचे गावातील मित्र सचिन पिसे, सागर अवताडे, श्रीकांत मगर, स्वप्नील जाधव, निळकंठ पाटील सकाळी दहा वाजल्यापासून माळशिरस येथील हनुमान मंदिराजवळ एकत्र जमले होते. प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापणेबाबत अक्षता कार्यक्रमाचे तसेच भजन व कीर्तनाचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. धार्मिक कार्य चालू असताना ११.४४ च्या सुमारास अनिकेत काशीद यांच्या मोबाईलच्या इंस्टाग्राम आयडी वर माळशिरस येथीलच त्यांच्या ओळखीचा जाहीद अन्सर इनामदार (वय १९) यांनी त्यांच्या इंस्टाग्राम आयडी वर बाबरी मशिद चा फोटो व त्या फोटोच्या वरती अरबी भाषेमध्ये मजकूर लिहिला होता. तसेच त्या फोटोच्या खाली इंग्रजीमध्ये sabar jab waqt hamara aayega tab sir dhad se alag kiye jayenge, असा मजकूर लिहिलेला स्टेटस त्याने ठेवला होता. हे अनिकेत काशीद यांनी पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्यासोबत असलेल्या तेथील लोकांनादेखील दाखवले.
अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना होत असताना, संपूर्ण देश हा उत्सव साजरा करत असताना हिंदूंचा द्वेष करणारा इंस्टाग्राम स्टेटस ठेवून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जाहीद अन्सर इनामदार यांनी केलेला आहे. त्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या विरुद्ध अनिकेत काशीद यांनी माळशिरस पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. जाहीद अन्सर इनामदार याच्यावर भारतीय दंड संहिता १८६० नुसार २९५-A आणि ५०६ गुन्हा नोंद झाला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
I was suggested this web site by my cousin. I’m not sure whether this post is written by him as no one else know such detailed about my trouble. You are incredible! Thanks!
I always look forward to your posts. This one, like the others, did not disappoint. Fantastic job!
Wonderful insights! The way you break down the complexities is commendable. For additional information on this topic, I recommend visiting: EXPLORE FURTHER. Keen to hear more opinions from the community!