ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

होलार समाज शक्तीसेनेच्या माळशिरस तालुक्याच्या निवडी संपन्न

अकलूज (बारामती झटका)

अकलूज येथील शासकीय विश्रामगृह येथे होलार समाज शक्तीसेना माळशिरस तालुक्याच्या निवडी पार पडल्या. या निवडी प्रसंगी होलार समाजाचे जेष्ठ नेते मनोहर जाविर महाराज, भिमराव आण्णा ऐवळे, संजयजी गोरवे, संस्थापक अध्यक्ष, होलार समाज शक्ती सेना संजयजी हेगडे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बिरूदेव केंगार, सोलापूर जिल्हाध्यक्ष होलार समाजाचे विचारवंत
प्रा. सचिन कोडगर सर, दिपक महिपत गोरे, फलटण तालुका युवा नेते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होलार समाज शक्ती सेना, माळशिरस तालुका अध्यक्ष प्रशांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली खालीलप्रमाणे निवडी करण्यात आल्या –
गणेश पारसे, कोळेगाव माळशिरस तालुका संघटक पदी, विजय पारसे पद्मावती नगर माळशिरस तालुका सल्लागार पदी, परमेश्वर केंगार वेळापुर, वेळापुर शहरध्यक्ष पदी.

तसेच यावेळी विशेष सत्कार देखील करण्यात आले. यामध्ये श्री. राजेन्द्र भिमराव ऐवळे इंडियन आर्मी आणि संजयजी संभाजी गेजगे मौजै मिरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी अमोल रामचंद्र ऐवळे, वैभव अंकुश ऐवळे, आकाश भारत जाधव, करण अंकुश ऐवळे, मल्हारी सतीश गेजगे, सुमित बाळू कांबळे, अनिकेत दिलीप ऐवळे, प्रदीपजी कांबळे, अभिषेक सखाराम जाविर, बाळासाहेब आत्माराम गुळग, प्रथमेश बाळू गुळग, बाळू दगडू करडे आदी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार सचिन करडे यांनी केले. तर, कार्यक्रमाचे आभार प्रशांत जाधव माळशिरस तालुका अध्यक्ष होलार समाज शक्तीसेना यांनी केले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button