ताज्या बातम्या

हॉटेल धनराज फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज हॉटेलचा थाटामाटात उद्घाटन समारंभ संपन्न झाला..

आई-वडील व जागा मालक यांच्या शुभ हस्ते ‘हॉटेल धनराज’ च्या दुसऱ्या शाखेचा शानदार शुभारंभ संपन्न झाला.

नातेपुते (बारामती झटका)

हॉटेल धनराज फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज हॉटेलचा शुभारंभ रविवार दि. 30/06/2024 रोजी सकाळी दहा वाजता श्री. सुदाम संभाजी काटकर, सौ. मंडाबाई सुदाम काटकर व श्री. विजय आप्पा जैन यांच्या शुभ हस्ते पुणे-पंढरपूर रोड, धर्मपुरी, स्वामी समर्थ मंगल कार्यालयासमोर धुम धडाक्यात व थाटामाटात उद्घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळी नातेपुते पंचक्रोशीतील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व कृषी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धर्मपुरी गावचे प्रगतशील बागायतदार व सौजन्यशील उद्योग व्यवसायामध्ये आदर्शवत असणारे गोरख काटकर यांनी आदर्श गाव धर्मपुरीचे आदर्श माजी सरपंच बाजीराव काटकर यांच्या सहकार्याने धर्मपुरी बंगला येथे हॉटेल धनराज सुरू केलेले होते. गेल्या दशकापासून सदरच्या हॉटेलमध्ये अनेक ग्राहकांनी आपल्या मनपसंत भोजनाचा आस्वाद घेतलेला आहे. धनराज हॉटेलच्या समोरून जुना पुणे-पंढरपूर रोड गेलेला होता. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाच्या विस्तारीकरणामुळे बायपास तयार झालेला आहे. त्यामुळे वाहतूक नवीन पालखी महामार्गावरून जाणार असल्याने ग्राहकांची अडचण होऊ नये यासाठी हॉटेल धनराज फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज हॉटेलची दुसरी शाखा सुरू करण्यात आलेली आहे.

जुन्या धनराज हॉटेलमध्ये मनपसंत भोजन मिळत आहे. मात्र, हॉटेल धनराज शाखा नंबर दोन या ठिकाणी प्युअर व्हेज सुरू करण्यात आलेले आहे.

मातोश्री सौ. मंडाबाई व पिताश्री सुदाम काटकर आणि ज्यांच्या जागेमध्ये भव्य आणि दिव्य हॉटेल उभारलेले आहे ते जागेचे मालक विजय अप्पा जैन यांच्या शुभहस्ते हॉटेलचा शुभारंभ करून समाजामध्ये वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे. सुसज्ज इमारत, स्वतंत्र बैठक व्यवस्था, प्रशस्त पार्किंगची सोय, 24 तास पाणी, टॉयलेट बाथरूमची सोय अशा सर्व सोयींनी युक्त असणाऱ्या हॉटेल धनराज फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज हॉटेलचा शुभारंभ झालेला आहे. तरी ग्राहकांनी सदरच्या प्युअर व्हेज हॉटेलचा आस्वाद घ्यावा, असे गोरख सुदाम काटकर यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

7 Comments

Leave a Reply

Back to top button