हॉटेल गॅलेक्सी 7 फॅमिली रेस्टॉरंट ग्राहकांच्या मनपसंत भोजनाची पर्वणी ठरत आहे..

नातेपुते (बारामती झटका)
पुणे-पंढरपूर महामार्गावर नातेपुते मांडवे दरम्यान मधुर मिलन मंगल कार्यालय शेजारी असणारे हॉटेल गॅलेक्सी सेवन फॅमिली रेस्टॉरंट काही महिन्यापूर्वी सुरू केलेले आहे. सदरच्या हॉटेलमध्ये सुसज्ज व प्रशस्त जागेत पार्किंगची सुविधा, जेवण करण्याकरता आरामामध्ये सुविधा आणि जेवणासाठी मनपसंत भोजन मिळत असल्याने दिवसेंदिवस ग्राहकांना मनपसंत भोजनाची पर्वणी ठरत आहे.

भांब गावचे माजी सरपंच युवा नेते उद्योजक धनाजी काळे व कण्हेर गावचे सचिन माने यांनी सुरू केलेले हॉटेल फॅमिली रेस्टॉरंट आहे. उद्योग व्यवसायनिमित्त बाहेरगावी गेल्यानंतर अनेकवेळा हॉटेलमध्ये जेवण्याचा प्रसंग आलेला असल्याने आपल्याही गावाकडे आपल्या परिसरातील लोकांना माफक दरामध्ये उत्कृष्ट जेवण देण्याची संकल्पना आलेली होती. डिके ग्रुप यांनी उत्कृष्ट पद्धतीने हॉटेलची रचना केलेली आहे. जेवणासाठी वेगवेगळ्या स्वतंत्र व्यवस्था केलेल्या आहेत. फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. तसेच मल्टीपर्पज हाॅल आहे.
शाकाहारी व मांसाहारी अशी वेगवेगळी किचन बनवलेली आहेत. शाकाहारी लोकांची भोजनाची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. उत्कृष्ट प्रकारे सर्विस मिळत आहे. त्यामुळे नातेपुते पंचक्रोशीतील ग्राहकांचा दिवसेंदिवस उदंड प्रतिसाद मिळत आहे. हॉटेल शहराच्या धर्तीवर जरी असले तरीसुद्धा ग्रामीण भागातील ग्राहकांना भोजनाचे दर परवडतील अशा पद्धतीने कमी पैशात उत्कृष्ट जेवण दिले जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.