जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा पुढे ढकलल्या, वेळापत्रक जाहीर

मुंबई (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात दुःखद निधन झाले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे तीन दिवसांचा दुखवटा आहे. त्यामुळे प्रचार करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना कमी कालावधी मिळणार होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा बदलल्या आहेत. आता 5 फेब्रुवारी ऐवजी 7 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर 7 फेब्रुवारी ऐवजी 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून कळविण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीनंतर राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. राज्यात 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीसाठी निवडणूक ही पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 5 फेब्रुवारीला होणार होती. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी जाहीर केला.
निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा बदलल्या आहेत. आता 5 फेब्रुवारी ऐवजी 7 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर 7 फेब्रुवारी ऐवजी 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून कळविण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



