ताज्या बातम्यासामाजिक

मराठा समाजाला दोन टप्प्यात आरक्षण; आजपासून कुणबी प्रमाणपत्र वाटप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई (बारामती झटका)

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दोन टप्प्यात आरक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा सोमवारी केली. क्युरेटिव्ह पिटीशन आणि न्या. संदीप शिंदे समितीच्या मार्गाने आम्ही हे आरक्षण देणार आहोत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे समितीचा अहवाल सादर करण्यात येणार असून मंजुरी मिळताच लगेच उद्यापासून मराठा समाजाला पुरावे असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.

यावेळी शांततेत आंदोलन करून सहकार्य करण्याचे भावनिक आवाहन करताना राज्यातील कायदा सुव्यवस्था राखा, टोकाचे पाऊल कोणीही उचलू नका तसेच सरकारला थोडा वेळ द्या. आम्ही सकारात्मक आहोत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. मंगळवारी कॅबिनेटच्या बैठकीत आम्ही न्या. शिंदे समितीचा अहवाल स्वीकारणार आहे. अहवाल स्वीकारल्यानंतर महसूलमंत्री जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून कागदपत्र तपासून कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करून घेतली
न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली आहे. ही पिटीशन सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. तसेच न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मजबूत आणि प्रभावीपणे मांडण्यासाठी तीन माजी न्यायमूर्तीची समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort