हृदय हेलावणारा अपघात : माळशिरस तालुक्यात कार व टेम्पोचा भीषण अपघात; माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर वाहन चालक हायगतीने चुकीच्या दिशेने गेल्याने अपघाताची घटना घडली
नातेपुते (बारामती झटका)
पुणे-पंढरपुर मार्गावरील कारूंडे (ता.माळशिरस) येथे पुलावर झालेल्या कार व टेम्पोच्या अपघातात चार जण ठार तर, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, लासूर्णे (ता. इंदापूर) येथील राजेश शहा हे आपल्या कामगारांना घेऊन सातारा येथील कासपठार पाहण्यासाठी निघाले होते. ते नातेपुते येथून राॅगसाईडने निघाल्याने हा अपघात लासूर्णे येथुन फक्त २० किमी अंतरावर असणाऱ्या कारूंडे (ता. माळशिरस) येथील पुलावर घडला.
यामध्ये राजेश अनिल शहा (वय ५५), दूर्गेस शंकर घोरपडे (वय २८), कोमल विशाल काळे (वय ३२), शिवराज विशाल काळे (वय १०) हे जागीच ठार झाले तर या अपघातात आकाश दादा लोंढे (वय २५), पल्लवी बसवेश्वर पाटील (वय ३०), अश्वीनी दूर्गेश घोरपडे हे जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हकीकत अशी की दि.06/10/2024 रोजी सकाळी 06.00 वा.चे पुर्वी माझा सख्खा मावस भाऊ दुर्गेश शंकर घोरपडे व त्यांची पत्नी अश्विनी घोरपडे तसेच त्यांचा मालक राजेश अनिलकुमार शहा व सोबत काम करणारे इतर चार लोक असे कास पठार, सातारा येथे शहा मालकाचे बलेनो गाडीमध्ये मौजे नातेपुते येथे येवुन तेथुन फलटणकडे जात असताना मालक राजेश शहा हे त्यांचे मालकीची बलेनो गाडी क्र. MH-42-AS-0564 ही गाडी नातेपुते ते फलटण जाणारे रस्त्याने राँग साईडने रस्त्याची कोणतीही खबरदारी न घेता हयगयीने बेदरकारपणे व भरधाव वेगात चालवुन तसेच समोरुन येणारा SMLयेसुझु सरताज 5252 xm पांढरे रंगाचा टेम्पो त्यांचा नंबर MH-42-AQ-3392 यास समोरासमोर जोराची धडक दिल्याने तसेच समोरुन येणारा वरील टेम्पो चालक याने टेम्पो हयगयीने रस्त्याची खबरदारी न घेता बेदकारुपणे व भरधाव वेगात चालवुन माझा सख्खा मावस भाऊ १) दुर्गेश शंकर घोरपडे वय २८ वर्षे, रा. लासुर्णे, ता. इंदापुर, जि. पुणे हा मयत झालेला दिसला व त्याचेसोबत शहा यांचे बलेनो गाडीत असलेले गाडीचे मालक २) राजेश अनिलकुमार शहा वय ५५ वर्षे, जंक्शन, ता. इंदापुर, जि. पुणे व त्यांचे सोबत गाडीमध्ये असलेले ३) कोमल विशाल काळे, वय ३२ वर्षे व त्यांचा मुलगा ४) शिवराज विशाल काळे वय १० वर्षे, दोघे रा. जंक्शन, ता. इंदापुर, जि. पुणे हे चौघे मयत झालेचे डॉक्टरांनी सांगितले. व त्यांच्या गाडीतील जखमी ५) आकाश दादा लोंढे वय २५ वर्षे रा. लासुर्णे, ६)अश्विनी दुर्गेश घोरपडे वय २५, ७) सुरज लोंढे यांना गंभीर दुखापतीस बलेनो चालक/मालक १) राजेश अनिलकुमार शहा वय ५५ वर्षे जंक्शन, ता. इंदापुर, जि. पुणे व २) SML येसुझु सरताज 5252 xm पांढरे रंगाचा टेम्पो त्यांचा नंबर MH-42-AQ-3392 यांचेवरील चालक नाव गाव माहीत नाही, असे दोघेजण दोन्ही वाहनाचे नुकसानीस व स्वत:चे मरणास तसेच गाडीतील इतर लोकांचे मरणास व दुखापतीस कारणीभुत झाले आहेत. नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर ओमासे तपासी अधिकारी आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.