ताज्या बातम्यामनोरंजनराजकारण

इनफॅन्सी किड्स प्ले स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

बारामती (बारामती झटका)

बारामती येथे सम्यक जनकल्याण प्रतिष्ठान संचलित इनफॅन्सी किड्स प्ले स्कूल चा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मंगळवार ११ मार्च रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. राहुल बाळासाहेब कर्चे, तांत्रिक अधिकारी मनेरगा बारामती हे होते. तर यावेळी श्री. सचिन विठ्ठल वाघमोडे तांत्रिक अधिकारी मनरेगा दौंड, एडवोकेट अनिश शिंदे, उद्योजक संजय शेठ सातव, योद्धा प्रोडक्शनचे नानासाहेब साळवे, शेतकरी योद्धा संपादक योगेश नालंदे यांच्यासह सम्यक जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश शंकर साबळे, सौरव सतीश साबळे, गौरव सतीश साबळे, ओंकार पवार, मधुकर बोंद्रे उद्योजक व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना नानासाहेब साळवे यांनी सांगितले की, लहान मुले नवीन गोष्टी क्षणात आत्मसात करतात. आत्ताच्या डिजिटल युगातल्या काही गोष्टी जेवढ्या फायदेशीर आहेत तेवढ्या हानिकारक सुद्धा आहेत. पालकांनी सजग राहून मुलांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. याच वयात योग्य संस्कार घडल्यास विद्यार्थी भविष्यात यशस्वी होऊ शकतो.

इनफॅन्सी स्कूलचे स्नेहसंमेलन नटराज नाट्य कला मंदिर येथे सायंकाळी संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापिका सौ. रूपाली खारतोडे यांनी केले. तर सूत्रसंचालन सौ. कविता डोईफोडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्कूलचा सर्वच स्टॉफ सौ. अर्चना चांदगुडे, सौ. रेणुका पवार, सौ. पूनम गुळुमकर, सौ. प्रिया डोंगरे या सर्वांनीच विशेष परिश्रम घेतले. यादरम्यान लहान मुलांनी विविध गीतांवर नृत्यविष्कार सादर करत त्यांच्या कलागुणांचे दर्शन प्रमुख पाहुण्यांना करून दिले.

गेल्या वर्षभरातील विविध स्पर्धांमध्ये, परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये अनुक्रमे देवकाते माही प्रमोद, नालंदे धर्मयुग योगेश, पाटील नक्षत्रा नितीन, नाझीरकर रेवा रणजित या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button