‘जागर संविधानाचा’ राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण मोठया उत्साहात संपन्न

सौ. निकिता पोळ प्रथम, सौ. कोमल सावंत व्दितीय तर कार्तिकी इंगवले तृतीय क्रमांकाच्या मानकरी.
अकलूज (बारामती झटका)
‘जागर संविधानाचा’ राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेचा पारितोषीक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. माळशिरस येथे प्रा. नीलम पंडीत व मा. न्यायाधिश दिपक राजे-पांढरे यांचे शुभहस्ते पार पाडला.
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माळशिरस तालुका वकील बांधवांनी आयोजित केलेल्या जागर संविधानाचा अभियान अंतर्गत “राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा २०२५” ही स्पर्धा माळशिरस येथील गोपाळराव देव प्रशाला येथे पार पडली. या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धकांनी भाग घेतला होता व त्यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषीक हे सौ. निकिता प्रविण पोळ यांनी पटकिवले असुन, त्यांना आयोजकांच्या वतीने आटा चक्की, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. व्दितीय क्रमांक सौ. कोमल सुमित सावंत यांना मिळाले असल्याने मिक्सर, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. तृतीय क्रमांकाचे पारितोषीक कार्तिकी गणेश इंगवले यांना डिनरसेट, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.

या प्रसंगी विचार व्यक्त करताना प्रा. नीलम पंडीत यांनी संविधानाचा जागर करीत असताना त्यातील मुल्य जीवनामध्ये अंमलात आणावे असे सुचित केले. तर, मा. न्यायाधिश दिपक राजे-पांढरे यांनी संविधानाने अस्पृश्यता नष्ट झाले असुन, जातीयता व अस्पृश्यता पाळणे गुन्हा असल्याचे अधोरेखीत केले. तसेच यावेळी विचार व्यक्त करीत असताना शंकर बागडे यांनी पोलीस पाटील पदावर काम करीत असल्याचे केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळेच शक्य झाल्याचे नमुद केले. तर प्रमोद शिंदे यांनी त्यांचे मनोगत खऱ्या अर्थाने माळशिरस तालुक्यातील वकील बांधवच संविधनाचा जागर करीत असल्याचे कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणुन माळशिरस वकील संघटनेच्या अध्यक्षा सौ. मोहिनी देव, पुरोगामी महाराष्ट्र न्युज चॅनेलचे संपादक प्रमोद शिंदे, माळशिरस वकील संघटनेचे अध्यक्ष तथा व्हाईस चेअरमन शंकर सहकारी साखर कारखाना, लि. सदाशिवनगरचे ॲड. मिलिंद कुलकर्णी, स्माईल एफ.एम. अकलूजचे हेड शंकर बागडे, डॉ. कुमार लोंढे आदींसह मोठ्या संख्येने सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक ॲड. धनंजय बाबर, सुत्रसंचालन ॲड. भारत गोरवे यांनी केले. तसेच पारितोषीक जाहीर करण्याचे काम ॲड. सुमित सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड. रजनी गाडे यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक समितीचे ॲड. सुनिता सातेपुते, ॲड. रजनी गाडे-सोनवळ, ॲड. धनंजय बाबर, ॲड. सुमित सावंत, ॲड. भारत गोरवे, ॲड. नितीन भोसले, ॲड. वैभव धाईजे, ॲड. अजिंक्य नवगिरे, ॲड. सुयश सावंत, ॲड. वैशाली कांबळे, ॲड. अभिषेक चंदनशिवे, ॲड. मनोज धाईंजे, ॲड. निलेश जाधव, ॲड. दत्तात्रय सावंत व सर्व सन्मानिय माळशिरस वकील संघटना सदस्य यांनी केले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.