जगजीवनराम झोपडपट्टीतील दुर्घटना पीडित कुटुंबांना ५ लाखांची मदत वितरित

सोलापूर (बारामती झटका)
सोलापूर शहरातील जगजीवनराम झोपडपट्टी भागात काही दिवसांपूर्वी दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तात्काळ प्रत्युत्तर देत पीडित कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती.
आज ही आर्थिक मदत प्रत्यक्षात पोहोचवण्यात आली असून, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संबंधित कुटुंबांना ५ लाख रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.

या वेळी बोलताना पालकमंत्री गोरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला आहे. दुःखद प्रसंगात राज्य सरकारने मदतीचा हात दिला असून, यामधून पीडित कुटुंबांना थोडासा आधार मिळेल अशी अपेक्षा आहे.
यावेळी स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



