ताज्या बातम्याराजकारण

“जखम रेड्याला डाग पखालीला”, अशी अवस्था भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्याची झाली -एक सोलापूरकर.

माढा लोकसभेसाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाची चर्चा दिल्लीत गेली तर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या बॅनरची चर्चा माळशिरस तालुक्याच्या गल्लीतच राहिली.

सोलापूर (बारामती झटका)

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघात प्रमुख नेते व कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी सुसंवाद भेटीच्या अनुषंगाने राज्यात दौरा सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघात शुक्रवार दि. 08/12/2023 रोजीचा नियोजित दौरा होता. माढा लोकसभा मतदार संघातील प्रमुख नेते व कार्यकर्त्यांची नियोजित बैठक सांगोला येथे संपन्न झालेली होती.

माढा लोकसभा मतदार संघात माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे चंद्रशेखर बावनकुळे यांचा नियोजित दौरा होता. माळशिरस तालुक्यातील भाजप बुद्रुक व भाजप खुर्द दोन्ही गटाच्या बैठका माळशिरस व अकलूज येथे संपन्न झालेल्या होत्या. याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. असे असताना धैर्यशील मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला अकलूजवरून फलटणकडे जाणाऱ्या मार्गावर माढा लोकसभेचे भावी खासदारच असे फलक लावलेले होते, याचीही वरिष्ठ पातळीवरून चर्चा झाली. माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील यांच्या भाजपच्या अंतर्गत बंडाळीचा फटका सोलापूर लोकसभा मतदारसंघातील नेते व कार्यकर्ते यांना बसलेला आहे.

सोलापूर दौरा माळशिरस तालुक्यामुळे रद्द झालेला असल्याने “जखम रेड्याला, डाग पखालीला”, अशी अवस्था भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्याची झाली असल्याची चर्चा सोलापूर लोकसभा मतदारसंघात रंगलेली आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे पुणे येथे प्रसार माध्यमांना माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या कार्यकाळात सिंचनाचे पाण्याचे, रेल्वे, रस्ते अशा अनेक प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याकरता सातत्याचा प्रयत्न करून देशांमध्ये अव्वल ५० खासदारांपैकी एक असल्याचे रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी कार्यातून दाखवून दिलेले असल्याने दिल्ली कोअर कमिटी व भारतीय जनता पक्ष निश्चित विचार करेल, असा ठाम विश्वास भाजपचे जबाबदार प्रदेशाध्यक्ष यांनी दिलेला आहे. महाराष्ट्राच्या प्रदेश कोअर कमिटीमधून नाव येत असल्याने माढा लोकसभेसाठी रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाची चर्चा दिल्लीत गेली तर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या बॅनरबाजीची चर्चा माळशिरस तालुक्याच्या गल्लीतच राहिली, अशी माढा लोकसभा मतदारसंघात चर्चा सुरू आहे.

भारतीय जनता पक्ष यांची ध्येयधोरणे इतर पक्षापेक्षा वेगळी आहेत. कोणी कितीही मोठा नेता अथवा पदाधिकारी असला तरी पक्षापेक्षा मोठा नसतो, ही भाजपची खरी ओळख असल्याने दोन खासदारावरून देशांमध्ये साडेतीनशे खासदारावर संख्या पोचलेली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षामध्ये ध्येयधोरणापेक्षा नेते मोठे समजले जातात. नेत्यांच्या शब्दाला किंमत असते मात्र, भारतीय जनता पक्षात कार्यकर्ता व सर्वसामान्य जनता यांच्या मताचा आदर करून कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष उभा राहत असतो. बॅनरबाजी अथवा स्वयंघोषित नेत्यांना भारतीय जनता पक्षात स्थान नसते. सध्या माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. आगामी काळात भारतीय जनता पक्ष कोणती भूमिका घेणार, याकडे मतदार संघाचे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

  1. Insightful and well-written! Your points are thought-provoking. For those wanting to learn more about this topic, here’s a great resource: FIND OUT MORE. Interested in hearing everyone’s perspective!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button