जल जीवन योजनेच्या कामाचे बिल न मिळाल्याने हर्षल पाटील यांची आत्महत्या….

हर्षल पाटील यांनी दुसऱ्याच्या नावावर कामं घेतली होती, सबलेट केलं नाही हीच चूक झाली आहे.
सांगली (बारामती झटका)
श्री. हर्षल अशोक पाटील, मु. तांदुळवाडी, ता. वाळवा, जि. सांगली यांनी जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामांची बिले न मिळाल्याने आत्महत्या केलेली आहे. मात्र, हर्षल पाटील यांनी सांगली येथील ठेकेदाराने जल जीवन योजनेचे काम दुसऱ्याच्या नावे केले. बिलास विलंब झाला लवकर बिले मिळाली नाहीत, त्यामुळे आत्महत्या केलेली आहे. दुसऱ्याच्या नावावर काम घेतली होती सबलेट केलं नाही हीच चूक झाली..
सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अभियान संचालक राज्य पाणी व स्वच्छता मिशन नवी मुंबई यांना दिलेल्या पत्रामध्ये विषयदि. 23/07/2025 व दि. 24/07/2025 रोजी वृत्तपत्रातील व वृत्तवाहिन्यावरील प्रसारित झालेल्या श्री. हर्षल अशोक पाटील यांच्या आत्महत्येच्या बातमीबाबत खुलासा केलेला आहे.
उपरोक्त विषयाचे दि. 23/07/2025 व दि. 24/07/2025 रोजी वृत्त वाहिन्या वृत्तपत्रात व इतर समाज माध्यमांवर श्री. हर्षल अशोक पाटील, मु. तांदुळवाडी, ता. वाळवा, जि. सांगली, यांनी जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामांची देयके न मिळाल्याने आत्महत्या केल्याची बातमी प्रसारित झाली आहे. त्या अनुषंगाने खुलासा सादर करण्यात येतो की, श्री. हर्षल अशोक पाटील यांनी जिल्हा परिषद सांगली कडील जल जीवन मिशन अंतर्गत कोणत्याही कामाचा करारनामा केलेला नाही. त्यामुळे त्यांची जल जीवन मिशन अंतर्गत देयक प्रलंबित असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे पत्र दिलेले आहे.
सदर पत्राच्या प्रती मंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबई, मुख्य सचिव महाराष्ट्र शासन, प्रधान सचिव पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग विभागीय आयुक्त पुणे विभाग, जिल्हाधिकारी सांगली पोलीस अधीक्षक सांगली यांना पाठविलेल्या आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



