जळभावी, बाडवस्ती येथे श्री संत बाळूमामा भंडारा उत्सवाचे आयोजन

जळभावी (बारामती झटका)
जळभावी ता. माळशिरस येथे श्री संत बाळूमामा भंडारा उत्सव २०२४ चे आयोजन शुक्रवार दि. ५/४/२०२४ रोजी जळभावी, बाडवस्ती, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. यावेळी आप्पाचीवाडी कुर्ली-मेतके व अक्कोळ येथे श्री हालसिद्धनाथ व श्री संत बाळूमामा यांच्या भागणूकीचे मुख्य मानकरी श्री. भगवान आप्पासो डोणे (महाराज) वाघापूरे व कु. सिद्धार्थ भगवान डोणे (महाराज) वाघापूरे यांचे जळभावी गावामध्ये जंगी स्वागत करण्यात येणार आहे.
तसेच दि. ५/४/२०२४ रोजी सकाळी ७ ते १० वा. मिरवणूक आणि सकाळी १० ते १२ भागणुक आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी जळभावी व पंचक्रोशीतील जास्तीत जास्त भाविक भक्तांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



