जळभावी गावच्या सरपंच पदी कोणाची वर्णी लागणार माळशिरस तालुक्याचे लागले लक्ष..
जळभावी गावचे सरपंच किसन रामा राऊत यांच्यावर अविश्वास ठरावानंतर सौ. पुष्पा बापू शिंदे यांची वर्णी लागण्याची शक्यता.
जळभावी (बारामती झटका)
जळभावी ता. माळशिरस या ग्रामपंचायतीचे सरपंच किसन रामा राऊत यांच्यावर अविश्वास ठरावाने रिक्त झालेल्या सरपंच पदाची निवड बुधवार दि. 03/01/2024 रोजी होणार आहे. जळभावी गावच्या सरपंच पदी कोणाची वर्णी लागणार, याकडे माळशिरस तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.
बारामती झटका त्यांच्या हाती आलेल्या वृत्तानुसार सौ. पुष्पा बापू शिंदे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. जळभावी ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान उपसरपंच आबासाहेब महादेव सुळ व माजी उपसरपंच भानुदास चोरमले गटाचे ग्रामपंचायतीमध्ये किसन रामा राऊत, आबासाहेब महादेव सुळ, आशाबाई हनुमंत राऊत, बकुळा भारत बोडरे, रतन सत्यवान कोळेकर, राधाबाई ज्ञानदेव सूळ, सुभाष भिवा धाईंजे, पुष्पा बापू शिंदे, दिलीप तुकाराम शेंबडे असे नऊ सदस्य आहेत.
आबासाहेब सुळ गटाचे किसन रामा राऊत सरपंच होते. त्यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा न दिल्याने आबासाहेब सुळ व भानुदास चोरमले दोन्ही गट यांनी एकत्र येऊन अविश्वास ठराव मंजूर केलेला होता. दोन्ही गटांमध्ये ठराविक काळासाठी पदाची विभागणी झालेली असून पहिल्यांदा भानुदास चोरमले गटाच्या पुष्पा बापू शिंदे यांना सरपंच पदाची संधी मिळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ग्रामसेवक श्री. प्रदीप भानुदास काळे कार्यरत आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Very engaging and funny! For more on this topic, visit: LEARN MORE. Let’s chat!