ताज्या बातम्याराजकारण

जळभावीचे सरपंच किसन रामा राऊत यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल..

दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा किसन रामा राऊत सरपंच पदावरून जनतेला देतील ? का पदावरून पायउतार होतील ?

माळशिरस (बारामती झटका)

जळभावी ता. माळशिरस ग्रामपंचायतीचे सरपंच किसन रामा राऊत यांच्या विरोधात सहा सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केलेला असून सदरच्या ठरावावर 13 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता ग्रामपंचायत कार्यालय येथे विशेष सभा होणार आहे. 14 तारखेला दीपावली पाडवा असल्याने जळभावीच्या ग्रामस्थांना सरपंच पदावरून शुभेच्छा देतील ? का पाय उतार होतील ?, याकडे माळशिरस तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.

जळभावी ग्रामपंचायतीची निवडणूक 2021 सालामध्ये झाली होती. या निवडणुकीत आबासाहेब सुळ गटाला सहा तर भानुदास चोरमले गटाला तीन जागा मिळालेल्या होत्या. आबासाहेब सुळ गटाचे किसन रामा राऊत सरपंच झालेले होते. अविश्वास ठराव आबासाहेब सुळ, रतन सत्यवान कोळेकर, आशाबाई हनुमंत राऊत, राधाबाई ज्ञानदेव सूळ, गोकुळा भारत बोडरे व पुष्पा बापू शिंदे यांनी सरपंच किसन राऊत यांचे विरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे. या ठरावात सरपंच हे इतर सदस्यांना विश्वासात न घेता काम करतात. विकासकामांबाबत उदासीनता, दाखवितात यासह अन्य कारणे देत अविश्वास ठराव तहसीलदार सुरेश शेजुळ यांच्याकडे दाखल केला आहे. तहसीलदार यांनी 13 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा बोलविली आहे. यावेळेस खरे चित्र स्पष्ट होईल.

पंचायत समिती माळशिरस येथे विकासकामांचे प्रस्ताव सादर करीत असताना सरपंच किसन रामा राऊत यांची बनावट सही करून प्रस्ताव दाखल केलेले होते. त्यावेळेस आता माझी सटकली, अशी म्हणण्याची वेळ सरपंचावर आलेली होती. आता मात्र, अविश्वास ठरावामुळे ग्रामपंचायत सदस्यांची सटकली अशी म्हणण्याची वेळ सरपंचावर येईल का ? अशी चर्चा माळशिरस तालुक्यात रंगलेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button