जलसंपदा मंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा माळशिरस तालुका दौरा जाहीर…

माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचा शुक्रवार दि. ०७/११/२०२५ रोजी माळशिरस तालुका दौरा जाहीर झालेला आहे.
बारामती विमानतळ येथून मोटारीने नातेपुते मार्गे माळशिरस विधानसभेचे माजी आमदार राम सातपुते यांच्या मांडवे ५० फाटा येथील श्रीराम निवासस्थानी आगमन होणार आहे. श्रीराम बंगला निवासस्थान येथून प्रकाशबापू पाटील यांच्या पाणीव ता. माळशिरस येथील दुपारी 12 वाजता होणाऱ्या श्रीराम महिला विज्ञान महाविद्यालय नूतन इमारतीचा शाखा उद्घाटन समारंभ व भाजप पक्ष प्रवेश सोहळ्यास उपस्थित राहून पाणीव येथून मोटारीने बारामती विमानतळाकडे जाणार आहेत तेथून कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत…


महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. शिवेंद्रराजे भोसले यांचा शुक्रवार दि. ०७/११/२०२५ रोजी माळशिरस तालुका दौरा जाहीर झालेला आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले शाहूनगर शेंद्रे, जि. सातारा येथून मोटारीने माळशिरस विधानसभेचे माजी आमदार राम सातपुते यांच्या मांडवे येथील श्रीराम निवासस्थानी आगमन होणार आहे. श्रीराम निवासस्थान येथून पाणीव येथील प्रकाशबापू पाटील यांच्या पाणीव ता. माळशिरस येथील दुपारी १२ वाजता होणाऱ्या श्रीराम महिला विज्ञान महाविद्यालय नूतन इमारतीचा शाखा उद्घाटन समारंभ व भाजप पक्ष प्रवेश सोहळ्यास उपस्थित राहून पानीव येथून सातारा येथील शुक्रवार पेठ येथे सुरुची निवासस्थान येथे सोयीनुसार मोटारीने जाणार आहेत.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



