ताज्या बातम्याराजकारण

जलसिंचनाच्या विविध योजना राबविल्यानेच मतदारसंघातील 80 टक्के क्षेत्र ओलिताखाली – आ. बबनदादा शिंदे

विरोधकांचे कसलेही काम नाही; नुसत्या थापा मारून खोटी आश्वासने देणे हाच त्यांचा धंदा

अपक्ष उमेदवार रणजीत बबनराव शिंदे यांच्या प्रचारार्थ दौरा

माढा (बारामती झटका) राजेंद्र गुंड यांजकडून

शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून प्रसंगी आमदारकी पणाला लावून माढा मतदारसंघात भीमा-सीना जोड कालवा, सीना-माढा उपसासिंचन योजना या दोन महत्त्वाकांशी जलसिंचन योजना राबविल्यामुळेच मतदारसंघातील सुमारे 80 टक्के क्षेत्र सध्या ओलिताखाली आले आहे. लवकरच बार्शी उपसासिंचन योजना कार्यान्वित होऊन माढा तालुक्यातील चार गावांना पाणी मिळणार आहे. सीना नदीवरून खैराव-मानेगाव उपसासिंचन योजनेला शासनाची तत्वतः अंतिम मंजुरी मिळाली आहे. शासनाकडून निधी उपलब्ध होताच ही योजना देखील कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे संपूर्ण तालुका ओलिताखाली आणण्याचे स्वप्न साकार होणार असल्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले आहे.

ते 245 माढा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांच्या प्रचारार्थ मानेगाव, ता. माढा, जिल्हा परिषद गटातील केवड, जामगाव, अंजनगाव, उमाटे येथील प्रचार दौऱ्यात सोमवारी 11 नोव्हेंबर रोजी बोलत होते.

पुढे आ. बबनदादा शिंदे यांनी सांगितले की, आजतागायत केलेल्या विकासकामांच्या जोरावरच मी जनतेला मतदान करण्याचे आवाहन करीत आहे. परंतु, विरोधकांचे कसलेही काम नाही, नुसत्या थापा मारून खोटे बोलून जनतेची दिशाभूल करीत आहेत. मतदारसंघात टेंभुर्णी व कुर्डूवाडी येथे एमआयडीसी सुरू केल्याने शेकडो लोकांना लहान-मोठे उद्योग व व्यवसाय सुरू करता आले. त्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे. तसेच शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून मोडनिंब येथील एमआयडीसीलाही मंजुरी घेतली असून भविष्यात ती कार्यान्वित होऊन अनेकांच्या हाताला काम मिळणार आहे. बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी साखर कारखाने, माढेश्वरी अर्बन व जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा दूध संघ, विविध शैक्षणिक संस्थांमध्ये सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले आहे.

यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक शंभूराजे मोरे, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक अमोल चव्हाण, मार्केट कमिटीचे संचालक हनुमंत पाडूळे, माढेश्वरी बँकेचे संचालक गणेश काशीद, खरेदी विक्री संघाचे संचालक शिवाजी बारबोले, पंढरपूरचे मारुती जाधव यांच्यासह गावोगावचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, साखर कारखाने, जिल्हा दूध संघ, माढेश्वरी अर्बन व जिल्हा मध्यवर्ती बँक, मार्केट कमिटी, खरेदी विक्री संघाचे आजी-माजी संचालक यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विकासाचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांना निवडून द्या – आ. बबनराव शिंदे
अतिरिक्त उसाचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध ठिकाणी साखर कारखाने उभे करून सातत्याने एफआरपी पेक्षा जास्त दर दिला. वीजेचा प्रश्न सोडविण्यासाठी मतदारसंघात ठिकठिकाणी सबस्टेशन व नवीन ट्रान्सफॉर्मर बसवले. अद्ययावत व व्यावसायिक शैक्षणिक सुविधेसाठी सीबीएसई बोर्डाचे स्कूल, डी. व बी. फार्मसी कॉलेजेस, कृषी महाविद्यालय, माध्यमिक विद्यालये व सिनिअर महाविद्यालय सुरू केले. आरोग्य सुविधांसाठी उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांसह ठिकठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू केली. पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसह शासनाच्या विविध योजनांमधून अनेक रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. हा विकासाचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांना निवडून द्यावे. त्यांचे निवडणूक चिन्ह सफरचंद असून येत्या 20 नोव्हेंबर रोजी त्या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.

शेतकऱ्यांची दिशाभूल करून, गावोगावी वाढदिवस आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे डिजिटल बोर्ड लावून आमदार होता येत नसते – शिवाजी कांबळे माजी सभापती, समाजकल्याण
विरोधी उमेदवाराकडे विकासाचा कसलाही अजेंडा व व्हिजन नाही. शेतकऱ्यांची दिशाभूल करून व गावोगावी वाढदिवस आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे डिजिटल बोर्ड लावून आमदार होता येत नसते. आमदार होण्यासाठी शेतकरी, सर्वसामान्य जनता व गोरगरिबांची कामे करावी लागतात, हे कदाचित विरोधी उमेदवारला माहीत नसल्याचा टोला त्यांनी लगावला. वाळू उपसा करणाऱ्या मंडळींच्या हाती मतदारसंघ न देता विकासकामांचा डोंगर उभा करणारे आ. बबनराव शिंदे यांचे कर्तबगार सुपुत्र रणजीत शिंदे यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन त्यांनी केले.

सुज्ञ व जागरूक मतदारांनी विरोधकांच्या दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला न फसता मतदान करावे – सुहास पाटील उपसभापती, मार्केट कमिटी
विरोधकांचा प्रचार हा फसवा आणि अफवा पसरवणारा आहे. मतदारसंघातील सुज्ञ व जागरूक मतदारांनी विरोधकांच्या दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला न फसता आ. बबनराव शिंदे व अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांनी आजतागायत केलेल्या विकासकामांवर ठाम विश्वास ठेवून मतदान करावे. स्थानिक गटतट व वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून भरघोस मतदान करून रणजीत शिंदे यांना निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button